Maharashtra

हातमजुर ४० कुंटुबांना रयत सेनेच्या वतीने किराणा वाटप

प्रतिनिधी नितीन माळे

हातमजुर ४० कुंटुबांना रयत सेनेच्या वतीने किराणा वाटप

चाळीसगाव – कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढत असून केंद्र व राज्य शासनाने राज्य देश लॉकडाऊन केल्याने हातावर पोट असणाऱ्या निराधार कुंटुंबापुढे एकवेळेच्या जेवणाचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांच्या मदतीला रयत सेना धावुन आली आहे शहरातील हातमजुर ४० कुंटुबांना रयत सेनेच्या वतीने आज किराणा वाटप करण्यात आले.

कोरोना चा फैलाव होऊन नागरिक बाधीत होऊ नये म्हणून देशात सपूर्ण लॉकडाऊन झाल्याने हातमजुर कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यांच्या पुढे परीवाराचा गाडा कसा चालवावा असा प्रश्न पडला आहे अशात रयत सेना त्यांच्या मदतीला धावली आहे शहरातील पवारवाडी येथील विठ्ठल रुख्मिणी मंदिर सभागृहात दि २ एप्रिल २०२० रोजी दुपारी १ वाजता रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेशभाऊ पवार यांच्या हस्ते प्रभाग क्र १० मधील हातमजुर कुटुंबाना किराणा साहित्य वाटप.

करण्यात आले. चाळीसगावात कुठल्याही आपातकालीन परीस्थितीत रयत सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मदत असो वा सेवा पुरविण्यासाठी अग्रेसर आहेत. आलेले संकट देखील लवकरच निवारेल असा आत्मविश्वास रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेशभाऊ पवार यांना आहे. तसेच नागरिकांना कोरोनावर मात करण्यासाठी दि १४ एप्रिल पर्यंत घरीच राहून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. यावेळी भिकन पवार,योगेश गव्हाणे, किरण पवार,बाळु पवार,चेतन पवार,अमोल सोनार ,सप्निल गायकवाड ,हरी पवार,राकेश पवार, निखील पवार,मच्छिद्र पवार, राहुल पवार उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button