Jalgaon

Jalgaon Live: गारखेडा येथे हाऊस बोट पर्यटन प्रकल्प… आता ना केरळ, काश्मीर ला जायची गरज नाही…

Jalgaon Live: गारखेडा येथे हाऊस बोट पर्यटन प्रकल्प… आता ना केरळ, काश्मीर ला जायची गरज नाही…

जळगाव जिल्ह्यातील गारखेडा येथे वाघूर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये एक आलिशान पर्यटन स्थळ विकसित झाले आहे. येथे आलिशान हाऊसबोट्स, बेटावरील विला आणि रेस्टॉरंट्स उपलब्ध आहेत. त्यामुळे केरळ आणि काश्मीरसारखा अनुभव जळगाव जवळच मिळतो आहे. इको-टुरिझमवर आधारित हे पर्यटन स्थळ पर्यटकांना आकर्षित करणारे अनेक आकर्षणे आणि सुविधा उपलब्ध करून देते. हाऊसबोट्समध्ये थ्री बीएचकेची सोय आहे, तर बेटावर बांबू हट आणि कोकणातील जांभा दगडापासून बनवलेले व्हिला आहेत.

समुद्र किनाऱ्यावर फिरणाऱ्या आलिशान हाऊसबोट, बेटावरच्या टुमदार हॉटेलचा आनंद घेण्यासाठी आता केरळ, काश्मीरला जाण्याची गरज नाही. कारण आलिशान हाऊसबोट, बेटावरच्या टुमदार हॉटेल आता जळगवापासून काही अंतरावर असलेल्या गारखेडा येथे वाघूर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये साकारलं आहे. जळगावपासून जवळच असलेल्या वाघूर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये गारखेडा गावाजवळ 20 ते 25 एकरावरील बेटावर जागेत शासनाच्या पर्यटन विभागाकडून मिनी काश्मीर आणि केरळ प्रमाणेच पर्यटन क्षेत्र साकारण्यात आलं आहे.

मुंबई वगळता महाराष्ट्रातील पहिले हाऊसबोट पर्यटन जळगावात उपलब्ध झाले आहे. थ्री बीएचकेची व्यवस्था असलेले हाऊसबोट सोबतच बेटावरील व्हिला, रेस्टॉरंट पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. बेटावर इको टुरिझमच्या धर्तीवर बांबू हट, बांबुचेच खुले रेस्टॉरंट, नऊ एसी हट उभारलेल्या तर कोकणातील जांभा दगडापासून फोर बीएचकेच्या तीन व्हिला या बेटावर साकारण्यात आल्या आहेत.

मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पेतून गारखेडा येथे हा पर्यटनाचा विकास करण्यात आला आहे. केरळ आणि काश्मीर प्रमाणेच या ठिकाणी हाऊसबोट, बेटावरील व्हिला, रेस्टॉरंट असून त्याद्वारे पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे. या ठिकाणी भव्य अशी महादेवाची नंदीसह मूर्तीसुद्धा साकारण्यात आली आहे. ती पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे. गारखेडा हे जळगाव जिल्ह्यातल्या पर्यटकांनाच नव्हे तर राज्यभरातील पर्यटकांना पर्यटनासाठी खुणावत असून पर्यटकांसाठी मोठी पर्वणी आहे.

काय-काय विशेष आहे?
गारखेडा पर्यटनस्थळात हा पहिला आयर्लंड रिसोर्ट आहे, ज्यामध्ये आपण वॉटर स्पोर्ट अॅक्टिविटीज आणि राहण्यासाठी रुम्सची व्यवस्था केली आहे. हे सर्व आपण इथे उपलब्ध केले आहे. आपण चार बंगले बांधले आहेत. त्यामध्ये स्विमिंग पूलदेखील आहे. आपल्याकडे तीन हाऊसबोट आहेत. त्यात प्रत्येकी तीन रुम राहण्यासाठी आहेत. वरती एक पार्टीसाठी 1200 फुटांचा डेक आहे. या व्यतिक्त आपल्याकडे वॉटर बोट अॅक्टिविटीज आहेत. त्यामध्ये स्पीड बोट आहे, पेडल बोट्स आहे, जेट्स स्की, सफारी बोट आहे, प्लेयिंग झोन, गार्डन, जीन आहे, गार्डन आहे. एसी आणि विना एसीचे रेस्टॉरंट आहे.

अजून एक नवीन रेस्टॉरंट सर्वसामान्यांसाठी सुरु होत आहे.याअगोदर तारकलीला जावं लागत होतं. तसेच केरळला पर्यटकांना जावं लागत होतं. पण आपल्या इथेही तीन मूव्हिंग हाऊसबोट आहेत. त्यामध्ये तीन रुम आहेत. त्यामुळे त्यासाठी आपल्याला केरळ किंवा काश्मीरला जाण्याची गरज नाही. तो अनुभव आपल्याला जळगावात घेता येणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button