जिल्हाधिकारी कार्यालयात महर्षी वाल्मिकी जयंती साजरी
सुरेश कोळी
जळगाव महर्षी वाल्मिकी यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्री.तुकाराम हुलवळे यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी निवडणुक तहसिलदार श्री. बाबासाहेब गाढवे, नायब तहसिलदार सर्वश्री.सुनिल सैंदाणे, रवि मोरे. अनंत कळसकर यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनीही महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
000






