Jalgaon Live: बासरी वादक योगेश पाटील रोटरी क्लब तर्फे सन्मानित..
जळगाव दि. ९ सप्टेंबर २०२३ रोजी रोटरी क्लब जळगाव मिडटाऊन वर्ष २०२३-२४ कलाकार मानपत्र देऊन एरंडोल चे प्रसिध्द बासरी वादक योगेश पाटील यांना सन्मानित केले. विशेष धन्यवाद श्री.व सौ. डॉ. रेखा रविंद्र महाजन. मानपत्र स्विकारताना संपूर्ण शिष्य समुह सोबत होता. बासरी वादक योगेश पाटील यांचे कला क्षेत्रात मोठे योगदान असून संपूर्ण देशात त्यांच्या बासरी वादनाचे कार्यक्रम होत असतात. आधुनिक काळात बासरी सारख्या दुर्मिळ वाद्याला आपल्या कलेच्या माध्यमातून जिवंत ठेवून ते अनेक शिष्यांना तयार करत आहेत. त्यांना मिळालेल्या योग्य सन्मानाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.






