Jalgaon

जळगावात 29 जानेवारी रोजी कवियित्री बहिणाबाई चौधरी राज्यस्तरीय कविसंमेलनाचे आयोजन

जळगावात 29 जानेवारी रोजी कवियित्री बहिणाबाई चौधरी राज्यस्तरीय कविसंमेलनाचे आयोजन

जळगाव येथे वसुनंदिनी फाउंडेशन आणि भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंचाचे कवियित्री बहिणाबाई चौधरी राज्यस्तरीय कविसंमेलनाचे आयोजन 29 जानेवरी 2023 रोजी ब्राह्मण सभा हॉल, बळीराम पेठ जळगाव येथे आयोजित करण्यात आले आहे.सामाजिक,आरोग्य, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारी वसुनंदिनी फाउंडेशन व साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणारी संस्था साहित्यिकांच्या हक्काचे व्यासपीठ म्हणून भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच या दोन्ही संस्थेचे समाजातील विविध स्तरांमधून नेहमीच कौतुक होत असते. दोनही संस्थांची स्थापना झाल्यापासून अतिशय कमी वेळात उत्तम प्रकारचे कार्य या संस्थेच्या वतीने पहायला मिळत आहे. विविध स्पर्धा, मार्गदर्शन शिबीरे राबविण्यात आली आहेत.
या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव शहरामध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी राज्यस्तरीय कविसंमेलन 2023 आयोजित करण्यात आले आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी राज्यस्तरीय कविसंमेलनास संमेलनाध्यक्षा म्हणून सुवर्णा पवार यांची निवड करण्यात आहे असून, प्रमुख उपस्थिती म्हणून भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंचाचे अध्यक्ष विशाल शिरसाठ, संस्थापक विजय जायभाये, कार्याध्यक्षा शिल्पा मुसळे, महिलाध्यक्षा चैताली कापसे, कोषाध्यक्ष छाया देसले, सचिव सुमंत पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष श्वेता देशपांडे उपस्थित राहणार आहेत.
कवयित्री बहिणाबाई चौधरी राज्यस्तरीय कविसंमेलनाचे आयोजन वसुनंदिनी फाउंडेशनचे अध्यक्ष विद्याधर सोनवणे, सचिव माधुरी कुळकर्णी,भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंचाच्या जिल्हाध्यक्ष संगीता महाजन, जिल्हा उपाध्यक्ष रूपाली मोरे, कार्याध्यक्ष रीता राजपूत,खजिनदार लिना नेमाडे, महिलाध्यक्षा ज्योती राणे, सचिव ज्योती वाघ, सहसचिव संध्या भोळे, संघटक संगीता बोरसे कोषाध्यक्ष पवन पाटील, प्रसिद्धी प्रमुख शिवाजी महाजन यांनी केले आहे. सदर कविसंमेलनास कवी,कवियित्री बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button