Amalner

Amalner: संसदेत गाजला अमळनेरच्या सारांशचा आवाज ; वकील संघाच्यावतीने सत्कार !

Amalner: संसदेत गाजला अमळनेरच्या सारांशचा आवाज ; वकील संघाच्यावतीने सत्कार !

अमळनेर येथील मान. सर्व न्यायाधीशांनी सन्मानित करून अभिनंदन केले !

अमळनेर –
येथील युवावक्ता व विधिज्ञ ॲड. सारांश धनंजय सोनार यांचे अमळनेर वकील संघाने सत्कार करून अभिनंदन केले . भारत सरकार , संसद सचिवालय आयोजित स्व. पंत. अटलबिहारी वाजपेयी यांचे जयंतीनिमित्त संसदेच्या सेन्ट्रलहॉल मध्ये ॲड. सारांश यांनी नुकतेच भाषण दिले , त्या बद्दल हा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला .
राज्यातून एकमेव प्रतिनिधी म्हणून दिल्लीत गौरव प्राप्त करणाऱ्या ॲड. सारांश सोनार यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश मा.श्री. एस बी गायधनी , जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. श्री. पी . आर . चौधरी, वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश मा. श्री. पी. पी. देशपांडे,मा. न्यायाधीश श्रीमती एस एस जोंधळे, मा. न्यायाधीश श्रीमती अमिता यादव यांनी सत्कार करून अभिनंदन केले . अमळनेर सह राज्याचे व अमळनेर वकीलसंघाचे नाव राष्ट्रीय पातळीवर नेल्याबद्दल सर्वांनी विशेष कौतुक केले व भावी यशासाठी सुयश चिंतीले.

या प्रसंगी ॲड. एस आर पाटील , ॲड. रमाकांत माळी , ॲड. अशोक बाविस्कर , ॲड. प्रदीप भट , सचिव ॲड. राजेंद्रकुमार कचवा , ॲड. के आर बागुल , ॲड. यज्ञेश्वर पाटील , ॲड. आर व्ही निकम , ॲड. सुशील जैन , ॲड. शशिकांत पाटील , ॲड. विलास वाणी, ॲड. शकील काझी , ॲड. संदीप बोरसे , ॲड. गोपाळ सोनवणे ,ॲड. आर टि. सोनवणे , उपाध्यक्ष ॲड. विवेकानंद चौधरी , ॲड. यु टी सोनवणे , ॲड जे यु बडगुजर , ॲड. पी. ए . पाटील , ॲड. नंदकुमार सूर्यवंशी , ॲड. आर बी चौधरी ,ॲड. जे पी साळी , ॲड. आर ए निकुंभ ॲड. गोपाल अग्रवाल , ॲड.अशोक बोरसे , ॲड. के व्ही कुलकर्णी ,ॲड. सलीम खान , ॲड. एस. एस. ससाने , ॲड . कुंदन साळुंखे , ॲड. किरण पाटील यांच्यासह अमळनेर वकील संघातील सन्मा. सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ॲड. सारांश सोनार यांचे अभिनंदन केले .
संसदेत राज्याचा एकमेव प्रतिनिधी म्हणून बोलण्याची संधी मिळाली , त्यासाठीच्या वकील संघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात माननीय न्यायाधीशांनी व वकील संघाने सन्मानित केले , हा माझेसाठी आणखी एक पुरस्कार असल्याचे ॲड. सारांश सोनार यांनी या कार्यक्रमात सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button