Jalgaon

Jalgaon Live: जिल्ह्याला येलो अलर्ट..! धरण व नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा..!

Jalgaon Live: जिल्ह्याला येलो अलर्ट..! धरण व नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा..!

जळगाव जिल्ह्यात यलो अलर्ट मुळे पावसाची शक्यता व धरणाची पाणीपातळी वाढण्याच्या शक्यतेमुळे दक्षता घेणेबाबत.
भारतीय हवामान खाते यांनी दिनांक 18/09/2022 रोजी दक्षता घेणेबाबत दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील आठवड्यात हवामान खात्याने अतिवृष्टी
होण्याची शक्यता वर्तवलेली असल्याने तसेच दिनांक 19/09/2022 ते दिनांक 23/09/2022 रोजी ताशी 30 ते 40 किलोमिटर वादळी वारा व विजांच्या कडकडाटांसह पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडुन प्राप्त झालेली आहे.
जिल्ह्यातील सर्व प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असुन नद्यांवरील लहान व मोठे प्रकल्पांचा धरणसाठा 100% पुर्ण भरलेला आहे. त्यामुळे सर्व लहान व मोठे घरणांच्या खालील तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील
नदीच्या पाणीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील शेतकरी व नदीकाठच्या गावातील नागरीकांनी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात यावा. शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी
आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवण्याची सुचना द्यावी. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रिसाठी आणला असेल अशा शेतमालाचे नुकसान होणार नाही याबाबत दक्षता घेण्याचे सुचित करावे. सदर परतीचा पाऊस ताशी 30 ते
40 किलोमिटर वादळी वारा व विजांच्या कडकडाटांसह कोसळणार असल्याने पावसा दरम्यान विजा व अतिवृष्टी पासुन बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेणेबाबत तसेच प्रसंगी झाडाखाली, विजवाहीनी अथवा ट्रान्सफार्मर जवळ थांबु नये
असे सुचित करावे. नागरीकांना याबाबत दक्षता घेणेकामी दवंडीच्या माध्यमातुन वेळोवेळी सतर्क करणेबाबत कार्यवाही करावी.
याबाबत संबंधीत विभागांनी आपल्या अखत्यारीतील सर्व यंत्रणा तसेच मान्सुन काळासाठी स्थापन करण्यात आलेल्या 24X7 नियंत्रण कक्षात नियुक्त अधिकारी कर्मचारी यांना यथायोग्य निर्देश देण्याची कार्यवाही करावी असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button