Jalgaon

Jalgaon Live: संतापजनक:रेल्वे ट्रॅक वर आढळला बालकाचा मृतदेह..! काळा दोऱ्यासह दुधाची बॉटल,शाल, औषध देखील…

Jalgaon Live: संतापजनक:रेल्वे ट्रॅक वर आढळला बालकाचा मृतदेह..! काळा दोऱ्यासह दुधाची बॉटल,शाल, औषध देखील…जळगावात काही दिवसांपूर्वी भरदिवसा एका तरुणाचा खून करण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच जळगाव जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. जळगाव शहरातील शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूललगत रेल्वे ट्रॅकजवळ एक बालकाचा मृतदेह आढळून आला.काय आहे संपूर्ण प्रकरण -जळगाव शहरातून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. छत्रपती शिवाजी नगर रेल्वे उड्डाणपूल नुकतेच नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. आज सकाळच्या सुमारास रेल्वे ट्रॅकजवळ काही महिन्यांचे बाळ मृतावस्थेत आढळून आले. त्याच्या हातापायाला काळा दोरा, शाल, औषधी आणि दूध पिण्याची बाटली, असे सर्व बालकाजवळ पडलेले होते. तसेच या बालकाला शालमध्ये गुंडाळलेले होते, अशा अवस्थेत तो आढळून आला.मागच्या आठवड्यात तरुणाचा खून –
जळगाव शहरातील शिवकॉलनी परिसरात मागच्या आठवड्यात तरुणाचा खून झाल्याची घटना घडली. मोबाईलच्या वादातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अक्षय असे मृत तरुणाचे नाव आहे. अक्षय हा त्याच्या मित्रांसह घराजवळ गप्पा मारत होता. याचवेळी तीन ते चार जण दुचाकीवरून आले आणि त्याला काही काम आहे, असं सांगून सोबत घेऊन गेले.
यानंतर शिवकॉलनीतील देशी दारूच्या दुकानावर अक्षय याचा बाळू पवार नावाच्या तरुणासोबत वाद झाला. या वादातून अक्षयने बाळूच्या भावाला दगड मारुन फेकला. याचा राग आल्याने बाळूने अक्षयच्या पोटात चॉपरने सपासप वार करुन त्याला गंभीर जखमी केले. यावेळी भांडणादरम्यान, अक्षयच्या सोबत असलेला त्याचा मित्र युवराज मोतीलाल जाधव हा या भांडणात पडला होता. मात्र, त्यालासुद्धा मारहाण करत जखमी केले आहे. यानंतर त्याचा मृत्यू झाला.Jalgaon Live: संतापजनक:रेल्वे ट्रॅक वर आढळला बालकाचा मृतदेह..! काळा दोऱ्यासह दुधाची बॉटल,शाल, औषध देखील...

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button