आरक्षण हक्क कृती समिती आयोजित आरक्षण बचाव आक्रोश मोर्चास सातपुडा आदिवासी विकास परिषद चा पाठिंबा आदिवासी विकास परिषद उल्हासनगर च्या मुंबई – ठाणे परिसरातील आदिवासी तडवी समाज बांधवांचा प्रत्यक्ष सहभाग
मुबारक तडवी रावेर
रावेर : आज 26 जून आझाद मैदानावरील आरक्षण बचाव आक्रोश मोर्चात जळगांव जिल्हा तडवी समाज बांधवांनी पाठिंबा देत प्रत्यक्ष सहभाग
जळगांव जिल्ह्यातील रावेर यावल चोपडा तालुक्यातील मुंबई स्थित तडवी भिल समाज बांधवांचा मोर्चात सहभागी झाले
संवैधानिक आरक्षण व हक्क संपविण्याचा षडयंत्राविरुध्द आज दि २६ जून रोजी आझाद मैदान, मुंबई येथे
आरक्षण हक्क बचाव कृती समिती तर्फे आदिवासी जाती जमाती भटक्या विमुक्त जमाती विशेष मागास प्रवर्ग आदिवासी आरक्षण हक्क बचाव समितीचे आवाहन स्विकारत आणि ओबीसी समाज जन आंदोलन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला या आक्रोश मोर्चात संपूर्ण महाराष्ट्रातील अधिकाधिक आदिवासी बांधवांनी आझाद मैदानावर मोर्चा आंदोलनात सहभागी होत निषेध नोंदवला जळगांव जिल्ह्यातील रावेर यावल चोपडा तालुक्यातील तडवी भिल मुंबई कल्याण उल्हासनगर परिसरात कार्यरत असलेली *सातपुडा आदिवासी विकास परिषद* या संस्थेतर्फे आझाद मैदान येथील आदिवासी आरक्षण हक्क बचाव समितीचे आवाहन स्विकारत आक्रोश मोर्चात सामील होऊन निषेध नोंदविला






