धानोली तांडा येथील अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर चिमुकल्याचे स्वप्न साकार
मनोज गोरे कोपरना
कोपरना : कोरपना तालुक्यातील धानोली तांडा हे एकमेव गाव या गावात बंजारा समाजाची वस्ती यांची संख्या मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे या ठिकाणी चिमुकल्या मुलांना शिक्षण घ्यावे अशी एक छोटीशी अंगणवाडी असावी असे स्वप्न या तांडा वस्ती मधील चिमुकल्या ने अनेक वर्षापासून साकारले होते परंतु त्यांच्या प्रतीक्षा अपूर्ण राहिल्यात मात्र या गावातील धडाडीचे युवक लोकप्रतिनिधीत्व करणारे असे सरपंच विजयजी रणदिवे यांनी या चिमुकल्या मुलां करिता अंगणवाडीची इमारत याठिकाणी व्हावीत या उदात्त हेतूने अनेक वर्षापासून सतत पाठपुरावा करून या वस्तीमध्ये देखणी अशी चीमुकल्या करिता अंगणवाडीची इमारत उभी व्हावीत याकरिता शासनाकडे सतत पाठपुरावा करून अंगणवाडीची इमारत मंजूर केलीत
आज दिनांक २०/५/२०२१ रोज गुरुवार ला ग्रामपंचायत धानोली तांडा वतिने जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत अंगणवाडी केंद्र धानोली चे लोकार्पण करण्यात आले.
त्या वेळी श्री. विजय रणदिवे सरपंच यांच्या हस्ते फित कापुन रितसर उदघाटन करण्यात आले त्या वेळी उपस्थित उपसरपंच बाळुजी कोवे, ग्रा.प. सदस्य रविंद्र चव्हाण, युवा नेते ओम पवार, सचिव कुबडे, अंगणवाडी सेविका उषाताई चव्हाण, मदतनीस राठोड ताई उपस्थित होते.
गेल्या २५ वर्षापासुन तांडा येथे अंगणवाडी केन्द्र किरायाच्या खोलीत छोटे चिमुखले बसत होते, सरपंच विजय रणदिवे यांनी मा. देवराव भाऊ भोगडे माजी अध्यक्ष .प. चंद्रपूर व माननीय सौ. गोदावरी क्रेद्रे माजी बाल जि.प कल्याण सभापती जि.प.चंद्रपुर यांना वारंवार पाटपुरावा करून अंगणवाडी ईमारत मंजूर करण्यात आले व ते काम पुर्ण करण्यात आले. यामुळे छोट्या बालकांना बसण्याची सुविधा निर्माण झाले. २५ वर्षी च्या पासून पाहिलेले चिमुकल्या चे स्वप्न आज पूर्ण झाले, त्यामुळे गावात आंनदमय वातावरण निर्माण झाले.






