?जळगांव Live.. कोरोना Update… जिल्ह्यात 22 रुग्णांचा मृत्यू…तर 1059 रुग्ण बाधित..अमळनेर ची संख्या झाली कमी..22 रुग्ण कोरोना बाधित…
जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम असून रविवारीदेखील 22 रुग्णांचा मृत्यू ओढवला असून 1059 बाधीत आढळले आहेत तर 24 तासात 1074 रुग्णांनी कोरोनावर मात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 9 हजार 277 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 96 हजार 153 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर आतापर्यंत एक हजार 931 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान, रविवारी एकाच दिवशी 1074 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर गेल्या 24 तासात तब्बल 22 रुग्णांचा मृत्यू ओढवल्याने चिंता व्यक्त करण्यात आली.
तालुका निहाय आकडेवारी..
जळगाव शहर 190,जळगाव ग्रामीण 12,भुसावळ 161,अमळनेर 22,चोपडा 132
पाचोरा 66,भडगाव 52,धरणगाव 42,यावल 65,एरंडोल 67,जामनेर 68,रावेर 39
पारोळा 37,चाळीसगाव 35,मुक्ताईनगर 08,बोदवड 49,अन्य जिल्हा 13






