Latur

“गेवराई रत्न” पुरस्कार जगन्नाथ जाधव यांच्यासह ११ जणांना पुरस्कार जाहीर

“गेवराई रत्न” पुरस्कार जगन्नाथ जाधव
यांच्यासह ११ जणांना पुरस्कार जाहीर

सुभाष मुळे लातूर

लातूर : गेवराई दि. ९ येथील सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या कलाविष्कार प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही गेवराई भूषण पुरस्कारासह, “गेवराई रत्न” पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. बदरंग ग्रुपचे सन्माननीय सदस्य जगन्नाथ जाधव सर, ज्येष्ठ रंगकर्मी नाट्यदिग्दर्शक तथा तालुका वकील संघाचे तालुकाध्यक्ष ॲड कमलाकर देशमुख यांच्यासह ११ जणांची ‘गेवराई रत्न’ पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे.
गेल्या सहा वर्षापासून, राजमाता जिजाऊ जयंती निमित्त दि १२ जानेवारी रोजी कलाविष्कार प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणाऱ्या मानाच्या पुरस्कारांची घोषणा दि ९ जानेवारी रोजी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर कलाविष्कार प्रतिष्ठानच्या वतिने करण्यात आली असल्याची माहिती आमचे पत्रकार सुभाष मुळे यांनी दिली आहे. यात ज्येष्ठ रंगकर्मी, नाट्यदिग्दर्शक तथा तालुका वकील संघाचे तालुकाध्यक्ष ॲड कमलाकर देशमुख यांना यावर्षीचा गेवराई भूषण हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर कोरोनाच्या परिस्थितीत गेवराई तालुक्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक संदीप काळे, सहा.पोलिस निरीक्षक मनीषा जोगदंड यांना पोलिसरत्न, लेखणीतून समाजप्रबोधन करणारे पत्रकार सुभाष सुतार, शोधवार्ता पत्रकार विनोद नरसाळे, जेष्ठ संपादक सुनील पोपळे यांना पत्रकाररत्न, समाजसेविका तथा सहारा अनाथालयाच्या संचालिका प्रितीताई गर्जे याना समाजरत्न, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ संजय कदम, कोव्हीड योद्धा डॉ राजेंद्र आंधळे, डॉ अर्चना शेळके यांना आरोग्यरत्न तर शिक्षण क्षेत्रातील जगन्नाथ जाधव, धर्मराज करपे यांना शिक्षणरत्न असे 12 पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. गेवराई भूषण पुरस्कारांसह, गेवराई रत्न पुरस्कारांचे वितरण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून, लवकरच वितरित करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी कलाविष्कार प्रतिष्ठानचे कार्यवाहक दिनकर शिंदे यांनी दिली.
याप्रसंगी प्रतिष्ठानचे सदस्य नारायण झेंडेकर, संतोष कोठेकर, शिवप्रसाद आडाळे, एकनाथ लाड, गणेश मिटकर, गजानन चौकटे, सचिन पुणेकर, रोहित चव्हाण, प्राचार्या सौ सीता महासाहेब यांच्यासह सचिव आशाताई शिंदे, उपाध्यक्ष सौ स्वाती कोठेकर, सहसचिव सौ ज्योतिताई झेंडेकर यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button