?सेक्स रॅकेट..पोलिसांचा हॉटेलवर छापा..गरजू मुलींना जाळ्यात फसवणाऱ्या सेक्स रॅकेट चा पर्दाफाश
बिहार गरजू मुलींना विविध प्रलोभने दाखवत त्यांना जाळ्यात फसवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेण्याचा धक्कादायक प्रकार बिहारच्या समस्तीपूरमध्ये उघडकीस आला आहे. पोलिसांनी एका हॉटेलवर छापा टाकला. त्यावेळी हॉटेलमध्ये अनेक तरुण-तरुणी आक्षेपार्ह स्थितीत आढळली. पोलिसांनी चोकशी केली असता त्यात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तसेच या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. तर तरुण तरुणींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे.
समस्तीपूरमधील दलसिंहराय शहरातील हॉटेलवर मोट्या प्रमाणात सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसाना मिळाली होती.
त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी हॉटेवर छापा टाकला. त्यावेळी अनेक तरुण-तरुणी पोलिसांना आक्षेपार्ह स्थितीत आढळली. पोलिसांनी त्यांना त्याब्यात घेत चौकशी केल्यावर या सेक्स रॅकेटची माहिती मिळाली आहे.
गरजू मुलींना प्रलोभने दाखवत त्यांना जाळ्यात फसवण्यात येते आणि त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करण्यात येतो. असा धंदा हॉटेलमध्ये सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या सेक्स रॅकेटमध्ये अनेक गरजू मुलींना फसवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस ठाणे प्रमुख हिमांशु कुमार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी छापा टाकून हॉटेलमधील प्रत्येक खोलीची तपासणी केली. त्यात 6 ते 8 तरुण-तरुणी आक्षेपार्ह स्थितीत आढळली. त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे. तसेच हॉटेल संचालकाच्या मुलालाही पोलिसांनी अटक केली आहे.
या सेक्स रॅकेटबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर हॉटेलवर नजर ठेवण्यात आली होती. मिळालेल्या माहितीत तथ्य असल्याचे समजल्यानंतर छापा टाकण्याची योजना आखण्यात आल्याचे हिमांशु कुमार यांनी सांगितले. पोलिसांनी छापा टाकल्याचे समजताच हॉटेलचा संचालक फरार झाला आहे.मात्र, त्याचा मुलगा आणि एका कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.
या टोळीत सहभागी असलेले आसपासच्या गावातील गरजू मुलींना हेरत होते. त्यांना विविध प्रलोभने आणि आमिषे दाखवण्यात येत होती. त्यानंतर त्या मुली जाळ्यात फसल्यानंतर त्यांना वेश्याव्यवसायात ढकलण्यात येत होते. अनेक गरजू मुलींना या टोळक्याने जाळ्यात ओढल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
