Jalgaon

? Breaking News.. पोलीस अधिक्षक डॉ प्रवीण मुंढे यांच्या आदेशानुसार जळगांव जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक आणि सहा. पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या…

? Breaking News.. पोलीस अधिक्षक डॉ प्रवीण मुंढे यांच्या आदेशानुसार जळगांव जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक आणि सहा. पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या…

प्रा जयश्री दाभाडे

जळगांव पोलीस अधिक्षक डॉ प्रवीण मुंढे यांनी आज रात्री उशिरा काढलेल्या आदेशानुसार 10 पोलीस निरीक्षक आणि 6 सहा. पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

पोलीस निरीक्षक बदली..

असे आहेत बदलीची नावे आणि ठिकाणे…

एमपीए नाशिक येथील निरीक्षक सुधीर भीमराव पाटील यांची बदली यावल पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

निरीक्षक ज्ञानेश्वर निवृत्ती जाधव यांची बदली एरंडोल येथे करण्यात आली आहे.

ठाणे शहर येथील निरीक्षक अशोक रावजी उतेकर यांची भडगाव पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे .

पीटीएस अकोला येथून हजर झालेले पोलीस निरीक्षक राहुल सोमनाथ खताळ यांची पहुर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली.

लोहमार्ग मुंबई येथून हजर झालेले पोलीस निरीक्षक जयपाल माणिकराव हिरे यांची धरणगाव पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

भडगावचे निरीक्षक धनंजय महादेव येरूळे यांची जळगाव शहर पोलीस ठाण्यात रीक्त पदी बदली करण्यात आली आहे तर
शहादा येथून हजर झालेले पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांची पाचोरा पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली.

लोहमार्ग औरंगाबाद येथून हजर झालेले निरीक्षक राहुल बाबासाहेब गायकवाड यांची बोदवड येथे बदली करण्यात आली.
अमरावती ग्रामीणहून बदलून आलेले निरीक्षक संतोष नारायण भंडारे यांची जळगाव नियंत्रण कक्षात पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

  • सहाय्यक निरीक्षकांच्याही बदल्या

अमळनेरचे सहा.निरीक्षक प्रकाश कचरू सदगीर यांची चाळीसगाव शहर वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे.

जळगाव तालुक्याचे सहा.निरीक्षक गणेश सुकदेव चव्हाण यांची नशिराबाद पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली.

नाशिक येथून आलेले सहा.निरीक्षक देविदास दादाराव इंगोले यांची सावदा येथे बदली करण्यात आली आहे.
धरणगावचे सहा.निरीक्षक पवन प्रतापराव देसले यांची

मेहुणबारे येथे तर एरंडोलचे सहा.निरीक्षक स्वप्नील कचरू उन्नवणे यांची निंभोरा पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे .
चोपडा ग्रामीणचे सहा.निरीक्षक संदीप सहदेव आराख यांची भुसावळ शहर वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button