अमळनेर
येथिल श्री वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थान मार्फत विद्यार्थी व गुणवंतांचा गुणगौरव समारंभ
दि.२१ जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे.
सालाबादा प्रमाणे यंदाच्या वर्षीहि श्री वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थान तर्फे १० वी चे ८० टक्के पेक्षा जास्त गुण मिळविणारे विद्यार्थी व १२ वी चे ७५ टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणारे विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे.त्याच प्रमाणे स्पर्धा परीक्षेत विशेष प्राधान्य मिळविणाऱ्यांचाही याप्रसंगी सत्कार करून गौरव करण्यात येणार आहे. या संभारंभास अनेक मान्यवर प्रशासकीय अधिकारी, सामाजिक,शैक्षणिक संस्थांचे
पदाधिकारी व मान्यवरांच्या उपस्थित राहणार आहे.
या गुणगौरव समारंभासाठी तालुक्यातील सर्वच शाळांमधून गुणवंत विद्यार्थ्यांची याद्या मागविण्यात आलेल्या आहे. त्यानुसार संबंधित विद्यार्थानी वृत्तपत्रातील वृत्त हेच आमंत्रण समजून रविवार दि २१ जुलै २०१९ रोजी दुपारी १ वाजता श्री वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थानच्या परिसरात सदर कार्यक्रमास उपस्थित रहावे. असे जाहिर आवाहन श्री वर्णेश्वर महादेव संस्थान तर्फे उत्सव समितीच्या वतीने रणजित शिंदे यांनी केले आहे.







