पश्चिम रेल्वे अंतर्गत येणारे चावलखेडा फाटक क्र 149 दि 24 ते 30 सप्टेंबर पर्यंत दुरुस्ती साठी बंद
जळगांव :- रजनीकांत पाटील
धरणगाव :- “पश्चिम रेल्वे अंतर्गत येणारे चावलखेडा फाटक क्र 149 दि 24 ते 30 सप्टेंबर पर्यंत दुरुस्ती साठी बंद”
पिंप्री खु .ता धरणगाव येथून जवळच असलेले पश्चिम रेल्वे अंतर्गत येणारे चावलखेडे हे रेल्वे स्टेशन आहे. येथून जवळच असलेले फाटक .क्र. 149 हे दिनांक 24 ते 30 सप्टेंबर 2020 पर्यंत दुरुस्ती साठी बंद असणार आहे.
परिसरातील बरीच खेड्यातील वाहतूक (सोनवद, हनुमंत खेडे ,वाघळूद बु , वाघळूद खु , सतखेडा, पिंपळेसीम, बोरखेडा, चावलखेडा ,पिंप्री ) ही चावलखेडा गेट क्र 149 मार्गानी धरणगाव तालुक्या पर्यंत असते.
दुरुस्ती च्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासन यांनी पत्रक काढून या बद्दल माहिती दिली आहे.
परिसरातील नागरिक ,प्रवासी, वाहतूक यांनी या दरम्यान अंजनी ब्रिज .br. no. 351 खालून वापर करावा असे सुचवण्यात आले आहे.
या बाबत अधिक माहिती साठी रेल्वे प्रशासनाने उपनिरीक्षक रेल्वे सुरक्षा बल अमळनेर, तहसीलदार धरणगाव, पोलीस स्टेशन धरणगाव, स्टेशन मास्टर चावलखेडा, सरपंच सोनवद ,सरपंच हनुमंतखेडे, सरपंच चावलखेडे, सरपंच पिंप्री , यांना पत्रका द्वारे कळवले आहे.






