पळपुट्या मंत्र्यांनो, खुर्ची सोडा ; जळगावात अभाविपचा नारा
पालकमंत्र्यांच्या घरी मंत्री सामंतांनी निवेदने घेतली; अभाविपला टाळले
जळगाव >> कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत हे शुक्रवारी आढावा बैठकीसाठी आले होते. तत्पूर्वी सामंत हे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या घरी थांबले. तेथे काही संघटनांची निवेदने त्यांनी स्वीकारली.
यानंतर विद्यापीठात आल्यानंतर त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांची नियोजीत भेट टाळली, निवेदनही घेतले नाही. अखेर मंत्री सामंत हे परत जात असताना विद्यार्थ्यांनी भरपावसात त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला.
यानंतर सामंत यांचे सुरक्षारक्षक, पोलिसांनी बळाचा वापर करुन विद्यार्थ्यांशी धक्काबुक्की केली. यात काही विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. संतप्त विद्यार्थ्यांनी ठाकरे सरकारचा तीव्र निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली.
कोरोनाने लांबलेल्या अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार राज्यातील विद्यापीठांकडून अंतिम वर्षाच्या परीक्षांची तयारी सुरू आहे.
या तयारीचा व अडचणींचा आढावा घेण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत शुक्रवारी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आले होते.
यावेळी विद्यार्थ्यांच्या समस्या मांडण्याठी व विविध मागण्यांचे निवेदन देण्यासाठी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी त्यांची वेळ घेतली. मात्र, त्यांची भेट न घेता, निवेदन न स्विकारता सामंत परतण्यासाठी निघाले.
यामुळे अभाविपच्या संतप्त कार्यकर्ते विद्यापीठ परिसरात ठाण मांडून बसले. सामंत यांचा ताफा परतीसाठी निघाल्यानंतर अभाविपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत त्यांचा ताफा अडवला.
यानंतर सामंत यांचे सुरक्षारक्षक, पोलिसांनी बळाचा वापर करीत धक्काबुक्की केली. यात काही विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. या प्रकारामुळे विद्यापीठ परिसरात प्रचंड गोंधळ उडाला होता.
गोंधळाच्या काही वेळानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांचा विद्यापीठातून ताफा निघून गेल्यानंतरही अभाविपच्या कार्यकर्त्यांनी कुलगुरूंनी भेट घेवून समस्या जाणून घ्यावी, म्हणून आंदोलन सुरूच ठेवले होते.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यासह कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना मारहाण करण्याचे आदेश दिले असावे, म्हणून पोलिसांनी मारहाण केली असल्याचा आरोपही अभाविपच्या कार्यकर्त्यांनी केला.






