यावल येथे कांदा निर्यात बंदी चा विरोधात तहसिलदार यांना काँग्रेसचे निवेदन
जळगांव ता.यावल रजनीकांत पाटील
दि.16 सप्टेंबर 2020 रोजी यावल तालुका शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदार जितेंद्र कुवर साहेब यांना निवेदन देण्यात आले. यावल तालुका काँग्रेस ब्लॉक कमिटी अध्यक्ष जिल्हा परिषद चे गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घेऊन शेतकऱ्यांना न्याय देणेबाबत जगभरात लॉकडाऊन असताना मोठ्या कष्टाने शेतकऱ्याने कांद्याचे उत्पादन घेतले. कांद्याला आता कुठे चांगला भाव येऊ लागल्याने दिसत होते चार पैसे हातात पडतील अशा शेतकऱ्याला आशा होती. पण केंद्रातील लहरी मोदी सरकारने अचानक निर्यातबंदी जाहीर करून शेतकऱ्यांवर घोर अन्याय केला आहे.
तीन महिन्यापूर्वी म्हणजेच 4 जून 2020 रोजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कांदा बटाटा डाळींना जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळले असल्याची घोषणा करुन स्वतःची पाठ थोपटवून घेतली होती आणि तीन महिन्यात घूमजाव करून निर्णय बदलून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे.
या निर्णयामुळे कांद्याचे भाव कोसळून शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान होणार आहे, तरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करणारा कांदा निर्यात बंदीचा तात्काळ मागे घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी आम्ही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात प्रदेश काँग्रेस कमिटीच्या व जळगाव महानगर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करीत आहोत. उपस्थित निवेदन देताना भगतसिंग बापू पाटील जिल्हा इंटक अध्यक्ष अनु जाति जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकला ताई इंगळे कदीर खान शहराध्यक्ष इम्रान पैलवान जिल्हा युवक उपाध्यक्ष हाजी गफ्फार शहा तालुका उपाध्यक्ष अनिल जंजाळे शहर उपाध्यक्ष अश्पाक शहा मनोहर सोनवणे जाकीर मेंबर समीर मेंबर रहमान खाटीक राजू पिंजारी युवक शहर अध्यक्ष अमोल भिरूड संचालक शेतकी संघ समाधान पाटील सरपंच नावरे समीर बशीर मोमीन मेंबर गुलाम रसूल लीलाधर सोनवणे आदी उपस्थित होते.






