Latur

उस्मानाबाद जनता सहकारी बँकेने बोलावलेली सर्वसाधारण सभा नियमबाह्य व बेकायदेशीर.

उस्मानाबाद जनता सहकारी बँकेने बोलावलेली सर्वसाधारण सभा नियमबाह्य व बेकायदेशीर.

रजिस्ट्रार मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी नवी दिल्ली आणि श्री. कौस्तुभ दिवेगावकर जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्याकडे बँकेचे सभासद व्यंकटराव पनाळे यांनी केली तक्रार दाखल.

लातुर : दि. १० – उस्मानाबाद जनता सहकारी बँकेने दि. २०/०९/२०२० रोजी बोलावलेली सर्वसाधारण सभा ही नियमबाह्य व बेकायदेशीर असून या सर्वसाधारण सभेच्या विरोधात बँकेचे सभासद व ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव पनाळे यांनी रजिस्ट्रार मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी नवी दिल्ली, श्री. कौस्तुभ दिवेगावकर जिल्हाधिकारी उस्मानाबाद आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उस्मानाबाद जनता सहकारी बँक लिमिटेड उस्मानाबाद यांच्याकडे लेखी स्वरुपात तक्रार दाखल केली आहे.

उस्मानाबाद जनता सहकारी बँकेची सभासद संख्या ७२८४३ आहे. या सर्व सभासदांना बँकेचा छापील अहवाल पाठवून सर्वसाधारण सभेचे निमंत्रण देण्यात आले असून सर्वसाधारण सभेस येताना सभासदांनी अहवालाची प्रत सोबत आणणे आवश्यक असल्याचे जाहीर केले आहे. बँकेने दिनांक २०/०९/२०२० वार रविवार रोजी दुपारी १ वाजता श्री संत ज्ञानेश्वर मंदिर सभाग्रह, उस्मानाबाद येथे सर्वसाधारण सभा आयोजित केलेली आहे. सर्वसाधारण सभेची नोटीस दिनांक ०४/०९/२०२० रोजी काढलेली आहे असे अहवालात छापलेल्या दिनांक वरून स्पष्ट होते. सदरची बोलावलेली सर्वसाधारण सभा माननीय संचालक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी नवी दिल्ली यांनी सध्या कोरोनाच्या परिस्थितीत घ्यावयाच्या सर्वसाधारणसभे विषयी, ती कोणत्या पद्धतीने घ्यावी याची नियमावली व मार्गदर्शिका दिलेली असून त्याचे अनुकरण करूनच वार्षिक सर्वसाधारण सभा घ्यावी असे स्पष्ट निर्देशित केलेले आहे. परंतु उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने सदर नियमावलीची व मार्गदर्शक तत्वाची कुठलीही अंमलबजावणी न करता सदरची सर्वसाधारण सभा नियमबाह्य व बेकायदेशीर बोलावलेली आहे. त्याविषयी
आज दिनांक १० सप्टेंबर वार गुरुवार रोजी सकाळी ११ वाजता व्यंकटराव पनाळे यांनी उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन श्री. कौस्तुभ दिवेगावकर जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना प्रत्यक्ष भेटून सदरील उस्मानाबाद जनता सहकारी बँकेने बोलावलेल्या नियमबाह्य व बेकायदेशीर सर्वसाधारण सभेविषयीच्या तक्रारीचे निवेदन दिले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button