अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, यावल शाखेतर्फे धुळे पोलीस प्रशासन व पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचा जाहीर निषेध
अमानुषपणे विद्यार्थ्यांना पोलिसांची मारहाण
जळगांव :- रजनीकांत पाटील
धुळेमध्ये मंत्री महोदय यांची गाडी अडवली म्हणून विद्यार्थ्यांना वर मारहाण केली त्याचे कारण कळेल का? मंत्री महोदय यांची गाडी अडवली तर गुन्हे दाखल करा गुरांसारखे मारहाण करायला ते गुन्हेगार नाहीत हो
विद्यार्थी आहेत हे विसरले का दबंग साहेब आता ज्यांनी मारहाण केली त्या महाशय साहेबांवर त्वरित कारवाई करावी सरकारने विद्यार्थ्यांवर मारहाण करणाऱ्या कृतीचा निषेध…यात अभाविप कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली.
आज यावल शाखेतर्फे निषेध करण्यात आला आणि तहसील कार्यलय येथे नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी नायब तहसीलदार साहेब यानी निवेदन स्वीकारले अब्दुल सत्तार व उच्च व अभियांत्रिकी शिक्षण मंत्री उदय सामंत यांची राजीनामा देण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी नगरसेवक डॉ कुंदनदादा फेगडे(अभाविप कार्यकर्ते) यावल तालुका प्रमुख अनिकेत सोरटे, सह तालुका प्रमुख मयुर पाटील शहर मंत्री जतीन बारसे, तेजस भोईटे, गौरव कोळी (मनविसे) स्नेहल फिरके (वी वा संघटना) अविनाश बारी (वि वा संघटना) जयवंत माळी, उज्वल कानडे, रितेश बारी, कोमल इंगळे, धनंजय बारी अभाविप कार्यकर्ते उपस्थित होते.






