Jalgaon

दोन हजार रुपयांची लाच घेताना तलाठी अडकला – एसीबीच्या जाळ्यात…

दोन हजार रुपयांची लाच घेताना तलाठी अडकला – एसीबीच्या जाळ्यात

जळगांव :- रजनीकांत पाटील

(चाळीसगांव) वडील मयत झालेले असुन त्यांचे नावे असलेल्या शेतीला घरातील सदस्यांचे नावे लावण्याच्या मोबदल्यात दोन हजार रुपयांची लाच घेत असताना तलाठ्यास रंगेहात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अडकवले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, वडील मयत झालेले असुन त्यांचे नावे असलेल्या शेतीला घरातील सदस्यांचे नावे लावण्याच्या मोबदल्यात आलोसे यांनी दि.31/07/2020 रोजी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष 2,000/-रूपये लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम दि.26/08/2020 रोजी पंचासमक्ष स्वतः (संतोष प्रताप शिखरे, वय-31, तलाठी- तांबोळे बु ॥, रा- शिवशक्ती नगर,चाळीसगाव) यांनी स्वीकारली. ही कारवाई चाळीसगाव औरंगाबाद रोडवर रांजणगाव फाट्यापासुन ५०० मीटर पुढे इस्सार पेट्रोलपंपासमोर रोडवर करण्यात आली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button