भारतीय जनता पार्टी व भाजपा शिक्षक आघाडी जळगांव महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनानिमित्त आयोजित सत्कार समारंभात जळगांव शहराचे विद्यमान आमदार राजू मामा भोळे यांच्या शुभहस्ते चित्रकार, उपक्रमशील शिक्षक, पर्यावरण मित्र ,पक्षी मित्र सुनिल दाभाडे सर यांचे शाल व वाचनीय दर्जेदार पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला . या कार्यक्रमास प्रमुख अतिथी मा.राजेश जाधव, मा.खंबायत सर,श्याम ठाकरे सर,हरून शेख आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. श्री.सुनिल दाभाडे सर त्यांचे शालेय उपयोगी उपक्रम, सामाजिक, पर्यावरण, पक्षी तसेच कलेमध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांचे कार्य लक्षात घेऊन त्यांच्या सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे बहारदार हिंदीतून सुत्रसंचलन मनोहर मोटवानी यांनी केले .
जळगांव