प्रगती विद्यामंदिरात ओझोन दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धेतून जनजागृती
जळगांव : गणेश कॉलनी स्थित प्रगती विद्यामंदिर शाळेत ‘ओझोन दिनाच्या’ महत्वाविषयी जनजागृती म्हणून वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन व नियोजन शिक्षक मनोज भालेराव यांनी इ सातवीच्या वर्गात केले होते. वक्तृत्व स्पर्धेसाठी ‘पृथ्वीचे संरक्षक कवच’ हा विषय देण्यात आला होता. मुख्याध्यापिका शोभा फेगडे यांनी विद्यार्थ्यांना ओझोन चे महत्व सांगून मार्गदर्शन केले. ओझोन वायूचे नेमके कार्य काय ? या विषयी विविध माहिती असलेले फलक, पोस्टर्स, बोर्ड वर्गात लावलेले होते फलकांवर विविध घोषवाक्य व चित्रांतून माहिती रेखाटलेली होती. ओझोन वायूचा थर नाहीसा झाला तर त्याचे काय परिणाम होतील या विषयीची माहिती मनोज भालेराव यांनी दिली व विविध चित्रांतून दर्शवून दिली. वक्तृत्व स्पर्धेत तेजस पवार, पौर्णिमा थोरात, मिलिंद वाणी, किशोरी रडे इ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. व आपले मत मांडण्याचा प्रयत्न केला.







