अखेर ती बातमी खरी निघाली…जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी अभिजित राऊत आज स्विकारणार पदभार..!
रजनीकांत पाटील
काही दिवसांपूर्वी ‘ठोस प्रहार’ वेब पोर्टलने जिल्हाधिकारी बदलण्याचे संकेत दिले होते आणि आज राज्य शासनाकडून सांगली येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले अभिजित राऊत आता जळगावचे नवे जिल्हाधिकारी राहणार आहेत डॉक्टर अविनाश ढाकणे यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश पारित करण्यात आले आहे. तसेच उद्या अभिजित राऊत हे पदभार स्विकारणार असल्याचे सांगितले आहे.
जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी यांच्याबद्दल थोडक्यात परिचय..
जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या जागी सांगली जिल्हापरिषदेचे सीईओ अभिजित राऊत यांची नियुक्ती झाली आहे. श्री. राऊत हे मूळचे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील रहिवासी आहेत. त्यांचे शिक्षण बुलडाण्यात झाले असून ते 2013 सालच्या बॅचचे आयएएस असलेले राऊत तरुण व संयमी स्वभावाचे अशिकारी अशी त्यांची ओळख आहे. परिविक्षाधीन कालावधीत त्यांनी नंदुरबार येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून सेवा बजावली असून, सांगली जिल्हा परिषदेत सीईओ म्हणून अडीच वर्षांपासून ते सेवारत आहेत. तसेच त्यांना लिखाणात आवड असून सामाजिक सेवेतही ते पुढे आहेत. अशी मिळाली आहे.






