Jalgaon

जळगावात किरकोळ कारणावरून घरांवर दगडफेक

जळगावात किरकोळ कारणावरून घरांवर दगडफेक

रजनीकांत पाटील

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील चिंचोली गावात सोमवारी वेगवेगळ्या किरकोळ कारणांवरुन दोन कुटंुबियांमध्ये वाद झाले. यात दोघांची एकमेकांच्या घरावर दगडफेक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, कविता पंडीत पंढार (वय ३५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सोमवारी सकाळी १० वाजता झालेल्या वादात कविता ढाकणे, सुनिल गडकर, सारंग संजय ढाकणे, संजय यादव ढाकणे यांनी घरावर दगडफेक केली. तर कविता संजय ढाकणे यांनी दिलेल्या फिर्यादीतनुसार सोमवारी सकाळी वाजता किरकोळ कारणावरुन वाद झाल्यानंतर मुकेश पंडीत पंढार, महेंद्र पंढार व मंगलाबाई पंढार यांनी शिवीगाळ करुन घरावर दगडफेक केली असे म्हटले आहे. या दोन्ही प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button