युवा नेतृत्व जिनल जैन यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना मास्क,अन्न धान्य वाटप…
रजनीकांत पाटील
जळगांव
ज्ञानवर्धिनी फाउंडेशन तर्फे जिनल जैन यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना अन्नदान, मास्क, तसेच रोगप्रतिकार साठी औषध सुद्धा वाटप करण्यात आले. यांच्या वाढदिवसा निमित्त गोर गरीब गरजू लोकांना वाढ दिवसाचा इतर होणारा खर्च टाळून हा उपक्रम राबविण्यात आला.
त्यावेळी अनेकांनी या उपक्रमाचं स्वागत केलं वाढदिवसानिमित्त गरजूंना अन्नदान, दोनशे फूड पॅकेजचे वितरण करण्यात आले. तसेच रोग प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून गरजूंना औषधांचे वितरण करण्यात आले.त्यासोबतच मास्क वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी उपस्थित जिनल जैन,संस्थापक अध्यक्ष रवींद्र मोरे अनुताई कोळी, हेमंत बडगुजर, अनिल सोनवणे, विशाल शर्मा, जगदीश मंडोरा आदी उपस्थित होते