बहुजनांचा वरचे अन्याय थांबवा नाही तर जशास उत्तर देऊ
नेहा शिंदे भीम आर्मी महाराष्ट्र प्रमुख
प्रतिनिधी:-लक्ष्मण कांबळे
शिव, फुले, शाहू, आंबेडकरांच्या
पुरोगामी राज्यात जर आमची तरूण मुलं जातीयतेचा बळी ठरत असतील, आमच्या माय बहिणींवर हात उचलले जात असतील, आमच्या समाजाला गुंडगीरीने दबावात ठेवण्याचा नीच प्रकार केला जात असेल तर बंधू-भगिनींनो, लक्षात घ्या मनुस्मृतिने डोके वर काढायला सुरवात केली आहे, आता आंबेडकरी समाजाने जागे होणे आणि स्वत:तला स्वाभिमान जागवणे गरजेचे आहे. जातीवादी पक्षांच्या सतरंज्या उचलणे बंद करा. आणि एकत्रीत या. कार्यकर्तेच नसतील तर नेते झटक्यात सरळ होतील.
चला सारे मिळून या जातीवादाला शह देवूया.
मुख्यमंत्री आणि गृहमंत्री साहेब, महाराष्ट्रातील पोलिस प्रशासनाला सक्त आदेश द्या… जातीयतेचा बागुलबुवा मिरवणाऱ्या नीच मनुवृत्तीला जागीच ठेचा अन्यथा महाराष्ट्राचा युपी_बिहार व्हायला वेळ लागणार नाही. आंबेडकरी समाज जितका सोशिक आहे तितकाच तो निडरही आहे. आम्ही धर्म बदलला असला तरी भिमाकोरेगाव करणार्या शुरू महारांचं रक्त आजही आमच्या धमन्यांमध्ये वाहत आहे. मरायचेच ठरवले तर एकेकाला कापून मारू असे ही भीम आर्मी च्या
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा नेहा शिंदे म्हणाल्या.






