दिशा प्रतिष्ठानच्या अध्यक्ष पदी सोनू डगवाले तर उपाध्यक्ष पदी दिनेश गोजमगुंडे तर सचिव पदी जब्बार पठाण यांची निवड
दिशा प्रतिष्ठानची पहिली कार्यकारिणी जाहिर
लातुर प्रतिनिधी:-प्रशांत नेटके
लातूर : दिशा प्रतिष्ठाणच्या पहिल्या कार्यकारिणीची निवड रविवार रोजी झालेल्या बैठकीत करण्यात आली आहे. अध्यक्ष पदी सोनू डगवाले तर उपाध्यक्ष पदी दिनेश गोजमगुंडे यांची तर तर सचिव पदी जब्बार पठाण सर्वानुमते निवड जाहिर करण्यात आली. दिशा प्रतिष्ठाणच्या माध्यमातून सामाजिक कार्य विशेषत: विद्यार्थ्यांच्या प्रश्नासंदर्भात कार्य करण्यात येणार असल्याचे यावेळी झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले.
दिशा प्रतिष्ठानची पहिली बैठक रविवार दि.२४ मे रोजी गायत्री उत्सव येथे सोशल डिस्टन्स मध्ये डॉ. अशोक पोद्दार, अभिजीत देशमुख, प्रसाद उदगीरकर, डॉ. चेतन सारडा, किशोर भुजबळ, प्रसाद जोशी, रतन बिदादा व अविनाश कामदार यांच्या उपास्थितीत पार पडली.
या बैठकीत सर्वानुमते दिशा प्रतिष्ठानची पहिली कार्यकारिणी घोषित करण्यात आली. अध्यक्ष पदी सोनू डगवाले, उपाध्यक्ष पदी दिनेश गोजमगुंडे, सचिव पदी जब्बार पठाण, कोषाध्यक्ष पदी अजय शाह यांची निवड करण्यात आली, तर प्रकल्प समन्वयक म्हणून ऍड. वैशाली यादव, सदस्य विष्णू धायगुडे व इसरार सगरे यांची निवड करण्यात आल्याची माहिती दिशा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली आहे.
दिशा प्रतिष्ठानच्या पहिल्या कार्यकारणीत निवड झालेल्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे यावेळी दिशा प्रतिष्ठाणच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.






