नवरी नटली’ फेम महाराष्ट्राचे प्रसिध्द लोककलावंत छगन चौगुलें यांचे कोरोनामुळे निधन
प्रतिनिधी :-प्रशांत नेटके
कोरोनाने या महाभयंकर आजाराने संपूर्ण जगात थैमान घातले आहे.भारतात सुद्धा कोरोनाच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
दोनच दिवसांपूर्वी मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक आणि दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचं कोरोनामुळे निधन झाल्यानंतर आज प्रसिध्द लोककलावंत छगन चौगुलेंनी कोरोनामुळे जगाचा निरोप घेतला आहे. कोरोनाचं निदान झाल्यानंतर त्यांना अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णालयात हलवण्यात आल्याचं वृत्त एका वृत्तवाहिनीने दिलं आहे. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
नवरी नटली…काळूबाई सुपारी फुटली , हे छगन चौगुले यांचं गाणं तुफान लोकप्रिय आहे. ह्या गाण्याने त्यांना खास प्रसिध्दी दिली. कथा चांगुणाची’, ‘कथा श्रावण बाळाची’, ‘आईचे काळीज’, ‘अंबाबाई कथा : कथा तुळजापुरची भवानी’, ‘कथा देवतारी बाळूमामा’ यांसारखे कार्यक्रम करत प्रसिध्दी मिळवली.
छगन चौगुले हे हाडाचे लोककलावंत होते. त्यांनी लोककलेचे विशेष असे कोणतेही प्रशिक्षण घेतले नव्हते. तरीही त्यांची कला सादर करण्याची कौशल्य अफलातून होते. मुळातले ते जागरण गोंधळी होते. त्यामुळे त्यांची सुरुवात हे जागरण गोंधळाच्या कार्यक्रमातून झाली. परंतू, केवळ जागरण गोंधळाचे कार्यक्रम न करता त्यांनी स्वत:तील कलेला वाव दिला. अनेक देवी-देवतांची त्यांची गाणी कॅसेट-सीडी रुपात महाराष्ट्राच्या कानाकोप-यात आजसुद्धा मोठ्या उत्साहात ऐकली जातात.






