Latur

फिजिकल डिस्टन्सिंगसाठी ‘वसुंधरा’ प्रतिष्ठान कडून जनजागृती

फिजिकल डिस्टन्सिंगसाठी ‘वसुंधरा’ प्रतिष्ठान कडून जनजागृती

घरा बाहेर पडताना छत्रीचा वापर करण्याचे आवाहन; दुकानांसमोर पाळले जावे हे नियम

लातुर प्रतिनिधी:-प्रशांत नेटके

ठोस प्रहार वृत्तसेवा:-
लातूर – कोरोना या विषाणूजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन व्हावे याकरिता शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर जनजागृती आणि आवाहन करण्यात येत आहे. लातुरातील वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने छत्रीचे वापर करावे ज्यामुळे आपोआपच फिजिकल डिस्टन्सिंग पालन होईल यासाठी जनजागृती करण्यात येत असून, उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

कोरोना या आजाराने जगभर थैमान घातले आहे. या आजाराचा फैलाव होऊ नये यासाठी मास्कचा वापर करावा, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे असे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, अनेक ठिकाणी विशेष म्हणजे सार्वजनिक ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याचे निदर्शनास येते आहे. यावर उपाय म्हणून वसुंधरा प्रतिष्ठानने सार्वजनिक ठिकाणी छत्रीचा वापर करावा यासाठी जनजागृती उपक्रम राबविण्यात आला आहे. छत्रीचा वापर केल्याने आपोआपच दोन व्यक्तींमध्ये १ मीटर अंतर निर्माण होते. यातून आपोआपच फिजिकल डिस्टन्सिंग पाळले जाईल शिवाय उन्हापासून बचावही होईल, अशी माहिती वसुंधरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.योगेश शर्मा यांनी दिली. जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना छत्रीचा वापर करणे अनिवार्य केल्यास फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होण्यास मदत होईल.

वसुंधरा प्रतिष्ठानने सुरू केलेल्या या उपक्रमात रामेश्वर बावळे, भाग्यश्री नेलवाडे, गीता मोरे, तेजश्री बावळे यांनी सहभाग नोंदवला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button