Latur

भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा लातूर च्या वतीने लॉक डाऊन च्या काळात गुजरात च्या कामगारांना मदत

भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा लातूर च्या वतीने लॉक डाऊन च्या काळात गुजरात च्या कामगारांना मदत

लातूर लक्ष्मण कांबळे

भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय कार्याध्यक्ष महाउपासक आदरणीय भीमराव साहेब आंबेडकर यांच्या सुचनेनुसार जिल्हा शाखा लातूर पदाधिकाऱ्यांना अशी माहिती मिळाली की गुजरात येथील 6 कामगार ‘विश्व इंग्लिश गुरुकुल -साई रोड ,मध्यवर्ती कारागृह जवळ लातूर या शाळेच्या कामासाठी आले होते लॉक डाऊन झाल्यामुळे त्यांना परत त्यांच्या राज्यांमध्ये आणि गावांमध्ये जाता आले नाही आज पर्यंत जेवणाची व्यवस्था त्यांच्या संबंधित ठेकेदार यांनी केली होती ठेकेदार हादेखील सोलापूर येथे असल्याकारणाने त्यांच्या जेवण्याची व्यवस्था करणे शक्य नसल्यामुळे आणि ही गोष्ट भारतीय बौद्ध महासभेचे लातूर पदाधिकाऱ्यांना कळल्यामुळे त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्याचे ठरले तसे ग्रुपवर पदाधिकाऱ्यांना अहवान केले.

भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सचिव बौद्धाचार्य दत्तात्रय भोसले गुरुजी यांची मुलगी प्रा. पूजा दत्तात्रय भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त व जिल्हा सरचिटणीस अर्जुन कांबळे यांचे चिरंजीव प्रसेनजित अर्जुन कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि लातूर शहर सचिव शारदाताई हजारे व संघटक राजेंद्र हजारे आणि तालुका संघटक दीपक कांबळे यांनी अन्नधान्य किराणा सामान भाजीपाला इत्यादी साहित्य विना विलंब गुजरातेतील कामगारांना देण्याचे मान्य केले आणि आज दिनांक 25 एप्रिल 2020 रोजी त्यांना ते पोहोच करण्यात आले आहे याबद्दल सर्व दानदात्यांचे अभिनंदन लातूर जिल्हाध्यक्ष प्रा. बापूसाहेब गायकवाड, जिल्हा कोषाध्यक्ष राजाराम साबळे, जिल्हा उपाध्यक्ष विलास आल्टे, जिल्हा सचिव अभिमन्यू लामतुरे, लातूर तालुका सचिव पवन कांबळे सेलुकर, प्रा. डॉ. लहू वाघमारे, अशोक शिंदे गुरुजी, अजय गायकवाड, विलास गायकवाड, शत्रुघन भोसले, प्रेमनाथ कांबळे, कुंदन गायकवाड, हाणमंत कांबळे, देवराव जोगदंडे, रवी कांबळे, गुंडू सातपुते, बिभीषण ढगे आदींनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button