जिल्हा परिषद शाळा साळशिंगी ता.बोदवड येथे उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम
जितेंद्र गायकवाड
जळगाव, दि.२८ फेब्रुवारी साळशिंगी तालुका बोदवड अलीकडच्या काळामध्ये मराठी शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना कोणत्याच प्रकारची कलागुण त्यांच्यात अवगत नाही, असा बाह्य लोकांचा दृष्टिकोन तयार झालेला आहे.ह्या कारणासाठी पालक त्याच्या मुलांना उच्च डोनेशन युक्त शाळेत दाखल करतात ,पण ह्या सर्वाना लाजवेल अशी कला व गुण हे प्राथमिक शाळा साळशीगी येथील विद्यार्थ्यांनि सादर केले,त्यामुळे शिक्षकांनी केलेल्या ह्या कार्यामुळे जनतेच्या मनात पुन्हां आदर निर्माण झाला.येथील विद्याथ्यर्नि योग्य कला सादर करून शिक्षकाचे स्थान मनात भरण्यायोग्य केले. असे कार्यक्रम करण्यासाठी मुबलक धनसाठा लागत असतो तर हा साठा शिक्षकांनी स्वतः गोळा केला, बाकीचा गावकरी ह्याच्या मदतीने गोळा केला व उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम केला.
विद्यार्थ्यांच्या जडणघडण जीवनात शिक्षकांचा मोठा हात असतो हे या कार्यक्रमातून दिसून आले, सदर कार्यक्रमांमध्ये गावकऱ्यांनी मोलाचे मार्गदर्शन दिले तसेच हा कार्यक्रम पाहण्यासाठी आलेले बाहेरगावचे पाहुणे यांनीसुद्धा खूप सहकार्य केले.
कार्यक्रमामध्ये मुलांनी प्रभोधनात्मक कार्यक्रम, डान्स, नाटके योग्य असलेले गुण दाखवून त्यांनी त्यांची कला सादर केली आणि शिक्षकांनी सुद्धा परिश्रम घेऊन या मुलांकडून कार्यक्रम तयार करून घेतले. उत्कृष्ट कार्यक्रम झाल्यामुळे सर्व स्तरावर या कार्यक्रमाची चर्चा झाली.सदर उपस्थिती कुसुम रमेश नेमाडे मुख्याध्यापक गीतांजली योगेश बोरोले ,इमाम गवळी सर, शैलेंद्र रोहिदास अहिरे ,वंदना रमेश चौधरी ,महेंद्रसिंग पाटील, प्रीतम धनगर ,निलेश महाजन व गावकरी
सूत्रसंचालन शैलेंद्र रोहिदास अहिरे,महेंद्रसिंग पाटील यांनी केले.






