Latur

हासेगावच्या ‘हॅप्पी होम’चे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते उद्घाटन

हासेगावच्या ‘हॅप्पी होम’चे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते उद्घाटन

सामाजिक कार्यातून जगण्याची ताकद मिळते – नागराज मंजुळे

लातुर प्रतिनिधी:-प्रशांत नेटके

चांगले काम करताना अडचणी येत असतात .आपणच आपल्या अडचणीला प्रेरणादायी ठरतो. त्यामुळे जगण्याचा आनंद घेत असताना अडचणीची तमा बाळगू नये. सामाजिक कार्यातून जगण्याची ताकत मिळते,असे प्रतिपादन सिने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सोमवारी येथे केले.

हासेगावच्या 'हॅप्पी होम'चे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते उद्घाटनऔसा तालुक्यातील हासेगाव येथे सेवालयाच्या हॅप्पी होम प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी लेखक अरविंद जगताप, प्रमिलाताई आष्टेकर,बगिचा सिंग, सुभाषअप्पा मुक्ता, सेवालयाचे संस्थापक रवी बापटले यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मंजुळे म्हणाले,अज्ञान हे विचित्र असते .कुठल्याही चांगल्या गोष्टीला अडथळा येत असतो ,असे सर्व अडथळे पार करून रवी बापटले यांनी एचआयव्ही बाधित मुलांच्या संगोपनासाठी अविरत काम सुरू ठेवले आहे. एकटा माणूस खचत असतो .त्याला आधार मिळाला की बळ मिळते.हेच बळ देण्याचे काम सेवालय करीत आहे.

हासेगावच्या 'हॅप्पी होम'चे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते उद्घाटन

“सेवालयाने दिली जगण्याची उमेद”-अरविंद जगताप
अरविंद जगताप म्हणाले ,एचआयव्ही बाधित जोडपे असले तरी त्यांची मुले ही निगेटिव्ह जन्माला आली आहेत.त्यांना चांगले शिक्षण व राहण्याची सोय सेवालयाने करून दिली. यातून त्यांना जीवनाची नवी दिशा मिळाली आहे.

प्रास्ताविकात रवी बापटले म्हणाले,सेवालयातील मुलांचे हक्क संघर्षांतुन मिळाले.मुलांचे संगोपन केले.काही मुलींचा विवाह करून दिला.अशा मुलांसोबत राहायला मिळाले, हे मी माझे भाग्य समजतो.त्यांच्या आयुष्यातील क्षण सुंदर करण्याचा माझा प्रयत्न आहे.

यावेळी सूत्रसंचालन शैलजा बरुरे- बडगिरे यांनी केले. यावेळी महारुद्र मंगनाळे लिखित ‘नोंदी जागवी आठवणी’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमास अंनिसचे माधव बावगे,शिवराज कोरे, लिंबा थोरमोठे, शांतेश्वर मुक्ता, शंकर वडेरा,बालाजी सुळ,रुक्साना मुल्ला, कांतराव देशमुख,शाम बरुरे,उमाकांत बापटले,रविकिरण गळगे आदींची उपस्थिती होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button