आमदार अभिमन्यू पवार यांनी केली अचानक स्वस्त धान्य गोडाऊनची तपासणी.
पडझड झालेल्या गोडाऊनची दुरुस्ती कधी होणार ?
लातुर प्रतिनिधी:-प्रशांत नेटके
औसा – औसा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानाला देण्यात येणारे धान्य कमी येत असल्याच्या तक्रारी दुकानदार कडून सतत केल्या जात होत्या याबाबत औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी दि. २० फेब्रुवारीला अचानक औसा शहरातील स्वस्त धान्य गोडाऊनला भेट देत याठिकाणी धान्य व इतर कागदपत्रांची तपासणी केली.आमदारांनी अचानक भेट दिल्याने संबंधित प्रशासनाची धावपळ उडाली तर तपासणीदरम्यान पोत्यामध्ये २-३ किलो कमी धान्य असल्याचे निदर्शनास आल्याने आमदारांनी संबंधित प्रशासनाची चांगलीच कान उघाडणी केली.
मतदारसंघातील सर्व सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी मतदार संघातील प्रत्येक योजना व कामे पारदर्शक व्हावी यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांनी अनेक योजना व उपक्रम हाती घेतले आहेत.यातून शासकीय योजना सुलभ पद्धतीने सर्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहचतील हा उद्देश ठेवला जात आहे. दर्जेदार कामाचा पायंडा निर्माण करण्याच्या उद्देशाने आमदार अभिमन्यू पवार यांनी या काही दिवसातच मतदारसंघातील शासकीय व प्रशासकीय यंत्रणा गतीमान केली आहे. यामध्ये गुरुवारी अचानक स्वस्त धान्य गोडाऊनची तपासणी करुन सर्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहचत असलेल्या योजना बाबत ते किती गंभीरपणे विचार करतात हे जनतेच्या लक्षात आले असेल.

*गोडाऊन च्या पडझडीकडे दुर्लक्ष*
आमदार अभिमान्यु पवार यांनी शासकीय गोडाऊन ची अचानक भेट देऊन पाहणी केली व धान्य वितरणाची माहिती घेतली परंतु औसा तहसील च्या शासकीय गोडाऊनची पूर्वेकडील बाजूची पडझड झाली असून तालुक्यातील जनसामान नागरिकांचे जीवनावश्यक असणारे धान्य गोडाऊन च्या पडझडीमुळे सुरक्षित कसे राहील ? अशी चर्चा असून कर्तव्यदक्ष समजले जाणारे औशाचे आ.पवार यांनी मोठ्या प्रमाणात गोडाऊनच्या पडझडीकडे दुर्लक्ष कसे केले की ?….. अशी चर्चा केली जात आहे.







