जय जिजाऊ… जय शिवरायाच्या जयघोषात दुमदुमली जळगाव नगरी…
नितीन माळे
जळगाव येथे सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथून करण्यात आली.

यावेळी महोत्सव समितीचे अध्यक्ष आमदार मंगेश चव्हाण व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या रथावरील अर्धाकृती पुतळ्याचे पूजन करून करण्यात आली.
यावेळी जैन उद्योग समूहाचे अशोकभाऊ जैन, आमदार राजूमामा भोळे, महापौर भारतीताई कैलास सोनवणे, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार चंद्क्रांतअण्णा सोनवणे यांच्यासह सुकाणू समितीचे सर्व सदस्य, जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकारी, शिवभक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी जिजाऊ – बाल शिवराय वेशभूषा घोड्यावर बसून साकारल्याने मिरवणुकीची शोभा वाढवली.
सोबत सर्वजातीय – धर्मियांनी मिरवणुकीत सहभागी होत एकतेचा संदेश दिला.






