रक्तदान करून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन
लातूर :-प्रतिनिधी लक्ष्मण कांबळे
दिनांक १९ फेब्रुवारी रोजी लातूर येथील छत्रपती शाहू महाराज चौक येथे छत्रपती शिवाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त मराठा लिब्रेश टायगर संघटनेच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर आयोजन करण्यात आले होते.
सर्व प्रथम शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचेपूजन पुष्पहार घालून करण्यात आले तदनंतर अक्षय धावरे यांनी रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे रक्तदान केल्याने एखाद्या गरजवंताला जीवदान मिळू शकते असे मत व्यक्त केले तसेच अनेक मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर मार्गदर्शन करून
मोटारसायकल रॅली काडून रक्त दान करून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले यात रक्तदान शिबिरात भिम आर्मी भारत एकता मिशनचे महाराष्ट्र संघटक अक्षय धावरे हे रक्तदान करत असताना सोबत बबलू गवळे सूरज शिंदे व मराठा टायगर संघटनेचे अध्यक्ष महेश गुंड हे होते






