Latur

शिवजयंती निमित्त ‘वृक्षांसाठी पाणी’ उपक्रम वॉटर बॅग मधील शिल्लक पाण्यातून जगणार झाडे

शिवजयंती निमित्त ‘वृक्षांसाठी पाणी’ उपक्रम

वॉटर बॅग मधील शिल्लक पाण्यातून जगणार झाडे

वसुंधरा प्रतिष्ठानच्या वृक्ष संवर्धन अभियानाचे उद्घाटन

लातुर प्रतिनिधी:-प्रशांत नेटके

लातूर : झाडे लावा, झाडे वाचवा हा विषय केवळ कागदावर न राहता झाडांचे संवर्धन व्हावे या हेतूने गत पाच वर्षांपासून वसुंधरा प्रतिष्ठान कार्यरत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून वसुंधरा प्रतिष्ठानतर्फे पापविनाश रोडवरील व्यंकटेश प्राथमिक विद्यालयात वृक्षांसाठी पाणी या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थी स्वतःच्या वॉटर बॅगमधील शिल्लक पाण्यातून आता झाडे जगविणार आहे. यासाठी पाण्याची टाकी ठेवण्यात आली आहे. हा उपक्रम आदर्श उपक्रम म्हणून पुढं येत आहे.

विद्यार्थी शाळेत जाताना सोबत वॉटर बॅग मध्ये पाणी नेतात. मात्र, शिल्लक पाणी रस्त्यावर टाकून देतात. या पाण्याचा वापर वृक्ष संवर्धन करिता व्हावा यासाठी वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने वृक्षांसाठी पाणी हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रम अंतर्गत व्यंकटेश प्राथमिक शाळेत एक पाण्याची टाकी ठेवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना वॉटर बॅग मधील शिल्लक पाणी घरी जाताना या टाकीत टाकण्यास सांगण्यात आले आहे. या जमा पाण्यातून शाळा परिसरात लावण्यात आलेल्या झाडांचे संगोपन केले जाणार आहे. थेंबे थेंबे तळे साचे, होईल रक्षण वृक्षांचे…. असा संदेश टाकीवर लिहण्यात आला आहे. शिवजयंती दिवशी या उपक्रमाचे उद्घाटन झाले. भविष्यात अनेक शाळांमध्ये हा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धन चे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. जिजाऊ वेशभूषेतील अंकिता देशमुख आणि शिवराय वेशभूषेतील सोहमराज बावळे यांच्या हस्ते या नवख्या उपक्रमाचे उद्घाटन झाले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक डी.एस. सलके, प्रमुख पाहुणे पाटील सर, वसुंधरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.योगेश शर्मा, जिल्हाध्यक्ष उमाकांत मुंडलीक, जिल्हा सचिव रामेश्वर बावळे, सदस्य शीतल मगर, हुसेन शेख, रतन झंवर, सिया झंवर, प्रगती डोळसे, पॉल मॅडम, रसाळ मॅडम, शिक्षक शिवकांत स्वामी यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button