Jalgaon

योग्यता प्रमाणपत्र नसणाऱ्या डंम्परविरूध्द परिवहन विभागाची कारवाई

योग्यता प्रमाणपत्र नसणाऱ्या डंम्परविरूध्द

परिवहन विभागाची कारवाई

जितेंद्र गायकवाड

जळगाव, दि 12 (जिमाका) – नदीपात्रातुन चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या विना क्रमांकाचे ट्रॅक्टर, ट्रेलर व विना योग्यता प्रमाणपत्र मालवाहतुक करणाऱ्या डंम्पर विरोधात उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाद्वारे विशेष धडक तपासणी राबविण्यात येत असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.

योग्यता प्रमाणपत्र नसणाऱ्या डंम्परविरूध्द परिवहन विभागाची कारवाई

या मोहिमेतंर्गत परिवहन कार्यालयातील वायुवेग पथकातील मोटार वाहन निरीक्षक विलास चौधरी व सचिन दळवी यांच्या पथकाने विना क्रमांकाचे चोरटी वाळु वाहतुक करणाऱ्या आठ ट्रॅक्टर, ट्रेलरवर व विना योग्यता प्रमाणपत्र मालवाहतूक करणाऱ्या आठ डंम्परवर अटकावून ठेवण्याची दंडात्मक कारवाई करण्यात आली. विना क्रमांकाचे ट्रॅक्टरवर नियंत्रण ठेवुन, नदी पात्रातुन होत असलेला अवैध्य वाळू उपसा रोखण्यासाठी व दिवसेंदिवस होणाऱ्या रस्ते अपघातावर नियंत्रण करण्यासाठी विना प्रमाणपत्र मालवाहतुक करणाऱ्या डंम्परवर कार्यवाही करण्यात येत आहे.

योग्यता प्रमाणपत्र नसणाऱ्या डंम्परविरूध्द परिवहन विभागाची कारवाई

याप्रकारची धडक मोहिम यापुढेही पोलीस व महसुल विभागाच्या संयुक्त पथकाद्वारे सुरु असणार आहे, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव श्याम लोही यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

योग्यता प्रमाणपत्र नसणाऱ्या डंम्परविरूध्द परिवहन विभागाची कारवाई

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button