Latur

बुद्धलेणी खरोसा येथे रविवारी धम्मपद महोत्सवाचे आयोजन

बुद्धलेणी खरोसा येथे रविवारी
धम्मपद महोत्सवाचे आयोजन

लातूर, दि १६ वार रविवार: माता रमाई जयंती चे औचित्य साधून

प्रतिनिधी:-लातूर लक्ष्मण कांबळे

१६फेब्रुवारी २०२० रोजी खरोसा येथील बुद्धलेणी परिसरातील श्रावस्ती बुद्ध
विहारमध्ये धम्मपद महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भन्ते
सुमेधजी नागसेन यांनी दिली.
श्रावस्ती बुद्ध विहारात प्रतिवर्षी माता रमाई जयंती निमित्त धम्मपद महोत्सवाचे आयोजन केले जाते.

यावर्षी दि. १६ फेब्रुवारी रोजी
चंद्रपूरच्या ताडोबा अभयारण्य येथील भदंत ज्ञानज्योती महाथेरो यांच्या
प्रमुख उपस्थितीमध्ये महोत्सव संपन्न होणार आहे. यावेळी काळेगांव येतील
भन्ते महाविरो, उदगीरचे भन्ते नागसेन बोधी, लातूरचे भन्ते पय्यानंद, हिंगोलीचे भन्ते धम्मशील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच या
सोहळ्याप्रसंगी व्ही.के. आचार्य, मनोहरराव कांबळे, कैलास शिंदे, राजेंद्र बनसोडे, पृथ्वीराज चिलवंत, त्रिवेणीताई कसबे, चंद्रकला चिमाजी बनसोडे, दिनकरराव सरवदे, निळकंठ सदाशिव आवचारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
रविवारी सकाळी १० ते ११ या वेळेत मुख्य बुद्धलेणीतील बुद्धमूर्तींची पुज्यनिय भिक्खू संघाच्या हस्ते पूजा करण्यात येईल. सकाळी ११ ते ११ : ३० या वेळेत पुज्यनिय भिक्खू संघास भोजनदान देण्यात येईल.सकाळी ११ : ३० ते
१२ : ३० या वेळेत प्रा. राहुलदेव कदम यांचा बुद्धभिम गीतांचा कार्यक्रम होईल. तसेच धम्मपद
महोत्सवाचे उद्घाटन व भिक्खू संघाची धम्मदेसना होईल. सायंकाळी साडेचार ते पाच या वेळेत भिक्खू संघास चिवरदान देण्यात येईल. या कार्यक्रमाचे भोजनदान निलंगा तालुक्यातील शेळगी येथील मीनाबाई भिवाजी कांबळे करणार
आहेत. या सोहळ्यास बौद्ध उपासक – उपासिकानी मोठ्या संख्येने उपस्थित
रहावे , असे आवाहन संयोजक भन्ते सुमेधजी नागसेन यांनी आमच्या प्रतिनिधी कळवले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button