आदर्श माध्यमिक विद्यालयाने घेतला सहली दरम्यान दातृत्वाचा अनुभव
किरण चव्हाण
धरणगाव दि-३ धरणगाव येथील आदर्श माध्यमिक शाळेची सहल नुकतीच संपन्न झाली त्यात विद्यार्थ्यांनी दातृत्वाचा एक वेगळा अनुभव घेतला
शाळेची सहल धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील,अनेर धरण, नागेश्वर मंदिर, शिरपूर विमानतळ, बिजासनी माता मंदिर, बालाजीमंदिर, शिरपूर बगीचा, येथे आयोजित केली होती या सहली दरम्यान, नागेश्वर मंदिर, व परीसर यांची पहाणी करत असताना शिरपूर नगरीत असणारी लोकप्रिय व लोकांना रोजगार उपलब्ध करून देणारी प्रियदर्शनी सूतगिरणी व अनेक शैक्षणिक व नामवंत क्षेत्रात मोठ्या पदावर विराजमान असलेले व्यक्तिमत्व भूपेशभाई पटेल यांच्याशी भेट झाली असता त्यांनी सहलीत सहभागी शिक्षक व विद्यार्थ्याची आस्थेवाईकपणे चौकशी करून, आपण आमच्या मुकेशभाई आर पटेल सैनिकी शाळेला भेट द्यावी अशी आग्रहाची भूमिका घेतली, व शिक्षक आणि विद्यार्थ्यांना जाण्यासाठी आग्रह धरला, त्यांचे स्वीय सहाय्यक नवल वंजारी याना सूचना दिल्या की या शैक्षणिक सहलीतले विद्यार्थी व शिक्षक यांना सन्मानपूर्वक आपल्या सैनिकी शाळेवर घेऊन जाऊन भोजनासह सर्व प्रकारचे दालन व कक्ष, क्रीडांगण व तत्सम गोष्टीविषयी माहिती द्यावी,

ठरल्याप्रमाणे भाईंचा शब्द पाळून शाळेला भेट द्यायला सहलीचे विद्यार्थी व शिक्षक गेले असता त्यांच्या सैनिकी शाळेने जोरदार स्वागत केले
त्या शाळेचे प्राचार्य मि. दिनेशकुमार राणा यांच्या आदेशानुसार सैनिकी विद्यालयातील जेष्ठ शिक्षक ज्ञानेश्वर बी माळी यांनी विद्यार्थी व शिक्षकांना अत्याधुनिक प्रयोगशाळा, संगणक कक्ष, सुसज्ज ग्रंथालय, आकर्षित वर्गखोल्या, कलादालनाचे भांडार,मनमोहन संगीत दालन, अश्या अनेक गोष्टीचा विद्यार्थ्यांना परिचय करून दिला.

विद्यार्थ्यांनी भोजनाचा येथेच्छ आनंद घेऊन पुढील प्रवासासाठी सहल रवाना झाली
विद्यार्थ्यांनी शिरपूर विमानतळ, बिजसनी माता मंदिर बालाजी मंदिर येथे भेटी दिल्या तद्नंतर शिरपूर येथील भव्य असलेल्या बगिच्यात जलतरण तलावात बोटी चा आनंद लुटला
ही सहल यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक संदीप कुमार सोनवणे, सहलप्रमुख प्रवीण पाटील, मुकेश तोरवणे, वैशाली बाविस्कर, फिलीप गावीत,अमोल चौधरी यांनी व इतर शिक्षकांनी मेहनत घेतली
या सुंदर उपक्रमाचे कौतुक विद्यालयाचे अध्यक्ष सी के पाटील व सचिव सौ सुरेखा पाटिल यांनी केले आहे






