Dharangaw

राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त “बेटी बचाओ, बेटी पढाओ ” निमित्त रांगोळी व निबंध स्पर्धेचे आयोजन

राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त “बेटी बचाओ, बेटी पढाओ ” निमित्त रांगोळी व निबंध स्पर्धेचे आयोजन

किरण चव्हाण

धरणगाव (दि-24)इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय धरणगाव येथे “राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त” “बेटी बचाओ, बेटी पढाओ”या विषयावर रांगोळी स्पर्धा, व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले
विद्यालयातील इयत्ता आठवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेमध्ये एकूण 310 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला पैकी रांगोळी स्पर्धेचे नियोजन उपशिक्षिका भारती पाटील, माधुरी अराक,आरती जैन, किर्ती मराठे,रुपाली पाटील यांनी केले होते तर निबंध स्पर्धेचे आयोजन उपशिक्षक ए एस पाटिल, एन बी पाटील, डी एम पाटील संदीप मनुरे या शिक्षकांनी केले.

राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त "बेटी बचाओ, बेटी पढाओ " निमित्त रांगोळी व निबंध स्पर्धेचे आयोजनसंस्थेचे सचिव सी के पाटील व मुख्याध्यापिका सौ सुरेखा पाटील यांच्या परिक्षणातून रांगोळी स्पर्धा व निबंध स्पर्धेतील विद्यार्थ्यांना क्रमांक देण्यात आले.

एरंडोल येथील उपविभागीय प्रांत अधिकारी विनय गोसावी यांच्या आदेशानुसार पंचायत समिती धरणगाव चे गटशिक्षणाधिकारी अनिल बाविस्कर,व शिक्षण विस्तार अधिकारी अशोक बिऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाने तालुक्यातील प्रत्येक शाळेवर हा उपक्रम राबविण्यात आला
उपक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक डी एन पाटील, आर एन पाटील, आर पी पाटील,सौ ज्योती चौधरी, कविता पाटील, अश्विन पाटील,पंकज कोळी, राहुल अहिरे,मगन गावीत, गौरव बयस, पवन बिसेन, डी एन शिंदे, राहुल पाटील,मोरे सर व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंदानी सहकार्य केले.

राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त "बेटी बचाओ, बेटी पढाओ " निमित्त रांगोळी व निबंध स्पर्धेचे आयोजनउपक्रम मुख्याध्यापिका सौ सुरेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. क्रमांक आलेल्या विजेत्यांना प्रजासत्ताक दिनी बक्षीस वितरण करण्यात येणार आहे
या उपक्रमात मेहनत घेतलेल्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक संस्थेचे चेअरमन डी जी पाटील व सचिव सी के पाटील यांनी केले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button