लोणंद शिवसेनेच्या वतीने मंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार
प्रतिनिधी दिलीप वाघमारे
सातारा जिल्ह्याचे सुपुत्र राज्याचे नगरविकास सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचा खंडाळा तालुक्यातील लोणंद शहर शिवसेनेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्याचे नवीन मंत्री मंडळ निर्माण होत असताना जिल्ह्यातील सुपुत्र असलेले एकनाथ शिंदे यांची
मंत्री पदी वर्णी लागली.शिवसेनेचे निष्ठावान नेते म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहिले जाते.
त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मिळालेल्या मंत्री पदामुळे समस्त शिवसेनेतील पदाधिकारी कार्यकर्ते यांना आनंद झालेला आहे.म्हणून शिवसैनिक आवर्जून त्यांची भेट घेत त्यांचा सत्कार करीत आहेत.असाच सत्कार लोणंद येथील शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी महाबळेश्वर येथे जाऊन मंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला.यावेळी सत्कार करताना सातारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख अजित यादव,लोणंद शिवसेना शहर प्रमुख संदीप शेळके ,शिवसेना उपशहर प्रमुख अविनाश नलवडे, युवासेना शहर प्रमुख शंभुराजे भोसले ,दत्ताराज भोईटे व इतर शिवसैनिक उपस्थित होते.यावेळी आपण आपल्या मंत्री पदाचा वापर हा नक्की इथल्या जन सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी कराल.अशी अपेक्षा शिवसैनिकांना वाटते आहे.तसेच मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री बच्चू भाऊ कडू यांना ही यांच्या भेटी घेत सत्कार करून अभिनंदन केलेले आहे.






