Yawatmal

बिकेडी यवतमाळ जिल्हा आढावा बैठक उत्साहात संपन्न

बिकेडी यवतमाळ जिल्हा आढावा बैठक उत्साहात संपन्न

यवतमाळ / प्रतिनिधी – प्रफुल्ल कोवे

बिरसा क्रांती दलाची यवतमाळ जिल्ह्याची आढावा बैठक स्थानिक लॉर्ड बुद्धा हॉल येथे उत्साहात संपन्न झाली.
बिरसा क्रांती दल या संघटनेचे वार्षीक अधिवेशन, बिरसा क्रांती दल या संघटनेची बांधनी, आदिवासींची पदभरती, NRC, CAA संदर्भाने आदिवासींची भुमिका या विषयावर सखोल असे मार्गदर्शन बिरसा क्रांती दल संस्थापक अध्यक्ष दशरथजी मडावी यांनी केले. सभेला बिरसा क्रांती दलाचे राज्य महासचिव मा.प्रमोद घोडाम, राज्य संघटक वसंत कनाके,उपस्थित होते. राज्य महासचिव .मा.प्रमोद घोडाम यांनी आदिवासींच्या पदभरती संदर्भाने योग्य असे मार्गदर्शन केले
नवनियुक्त पदाधिकारी यांची नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली. जिल्हा उपाध्यक्ष पदी केशवराव बोरकर, जिल्हा सचिव पदी नागोराव गेडाम, दिग्रस तालुका अध्यक्ष पदी संगित पवार यांना नवनियुक्त केले.

त्यावेळी डॉ.पठाडे, अतुल कोवे, अरविंद कुडमेथे, निलेश उकंडे, संगीत पवार, गोपाल बोरकर, रमेश मडावी, विशाल राजगडकर, कृष्णा भिवनकर, भोजराज दुमारे, राजेश कुळसंगे, ऋषीकेश मडपाची, चेतन गेडाम, निलेश उकंडे, पवन अडमाते, निखिल कोडवते, आकाश भलावी,आशिष मरस्कोले,आशिष मसराम , विशाल राजगडकर, शरद भुसारे, विश्वंभर पुरके, वैभव कुडमते इत्यादी जिल्ह्यातुन पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेचे सुत्रसंचलन प्रा.कैलास बोके यांनी केले. संजय मडावी यांनी आभार मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button