Pandharpur

एस.टी.ने दिली धडक एक जण जागीच ठार

एस.टी.ने दिली धडक एक जण जागीच ठार

रफीक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील वाखरी गावाजवळ आज सकाळी पुन्हा एक अपघात झाला असून राज्य परिवहन महामंडळाच्या बसने दिलेल्या धडकेत एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. वाखरी परिसरात अपघाताचे प्रमाण वाढले आहे, अलीकडेच वाखरी येथील एका दूधविक्रेत्याचे अपघातात निधन झालेले होते त्यानंतर आज सकाळी पुन्हा एका दुचाकीस्वाराचा रस्त्यावरच मृत्यू झाला असल्याची दुःखद घटना घडली आहे. आज सकाळी वाखरी येथील बावन्न वर्षांचे राजू माने हे आपल्या दुचाकीवरून कामावर निघाले असताना हा अपघात झाला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसने त्यांना धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या बसने धडक दिल्याने या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे तथापि सदर बस अपघात करून निघून गेली परंतु जवळच असलेल्या काही नागरिकांनी बस क्रमांक घेतल्याने या बसची ओळख पटणार आहे. जागरूक नागरिकांनी या बसचा क्रमांक पोलिसांना दिला असून पोलिसांनी पुढील हालचाल जलदगतीने सुरु केली आहे. वाखरी परिसरात सतत अपघात होत असल्याने या भागात संताप असून ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button