Maharashtra

आज घडीला पुर्ण जगावर आलेल्या कोरोणा संकटामुळे सर्वसामान्य कुंभार समाज कुटु़ंबावर उपासमारीची वेळ आली आहे.

आज घडीला पुर्ण जगावर आलेल्या कोरोणा संकटामुळे सर्वसामान्य कुंभार समाज कुटु़ंबावर उपासमारीची वेळ आली आहे.

प्रतिनिधी वैभव घाटे

मातीपासून बनविल्या जाणारे सुरई, माठ, खुजे, रांजण, कुंड्या, घट, गाडगी, मडकी, झाकण्या, पणत्या, कौले, विटा, कुंड्या इत्यादी घडवून, त्या वस्तू भाजून विकणारा कारागीर म्हणजेच *कुंभार*. महाराष्ट्रातील कुंभार गौरी-गणपतीच्या, दुर्गेच्या आणि अन्य मूर्ती, हरतालिका, बैलपोळ्याचे बैल, दिवाळीच्या किल्ल्यात ठेवायच्या वस्तू आणि बाहुल्याही बनवतो. कुंभार हा *बारा बलुतेदारांपैकी* एक आहे.

या अश्या महामारी रोगांमुळे कुंभार समाजावर अश्या संकटामुळे आज जो समाज मातीची वस्तु बनवुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतो. त्या कुटुंबावर आज उपासमारीची वेळ आली आहे , म्हणुन सरकारने या विषयाकडे लक्ष देऊन समाजाला आर्थिक संकटावर मात करण्यासाठी मदत करावी, कारण उन्हाळा या ऋतुतच मातीच्या वस्तुला म्हणजेच विट, माठ अशा प्रकारच्या वस्तुला जास्त मागणी असते त्यामुळे कुंभार समाज ज्या गोष्टींवर अवलंबून असतो त्यावर लाँकडाऊनमुळे खुप भयानक अस संकट निर्माण झाले असुन, महाराष्ट्र सरकारने कुंभार समाजाला आर्थिक मदत करून त्यांना आपण आधार द्यावा अशी मागणी नांदेड जिल्ह्याचे *जिल्हाध्यक्ष श्री देवडे विजयरावजी* यांनी मुख्यमंत्री साहेबांना, तसेच नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. मा. ना. अशोकराव चव्हाण साहेबांकडे ईमेल द्वारे व थेट संपर्क साधुन संवाद साधले अशी माहीती महाराष्ट्र कुंभार समाज महासंघ सोशलमीडिया तालुकाध्यक्ष *श्री आमेटवार राजेश आबन्ना* आणि तालुकाध्यक्ष *श्री कुरणापल्ले बालाजी केरूरकर*
कार्याध्यक्ष तसेच गाव माझा न्यूज़ तालुका प्रतिनिधि बिलोली *श्री.राजाराम गुरगुलवाड आळंदीकर* यांनी दिली..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button