सायरदेवी बोहरा सेंट्रल स्कूल अमळनेर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
लोकमान्य टिळक शिक्षण संस्था संचालित, अमळनेर शहरातील सी.बी.एस.ई. सायरदेवी बोहरा सेंट्रल स्कूल,मंगरूळ येथे 75वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी 7.30 वाजता शाळेच्या क्रीडांगणात, संस्थेचे चेअरमन श्री सुरेंद्रजी बोहरा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रसंगी शाळेचे प्राचार्या डॉ. सौ. मंजुला नायर मॅडम , डायरेक्टर आशिष बोहरा, शाळेच्या एक्सीकेटीव्ह अॅड. सौ. आशाताई ,डॉक्टर सोनम बोहरा, आर्किटेक दिव्या बोहरा, कशिष बोहरा, प्रतिभा पाटील मॅडम,आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेचे प्राचार्य नायर मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना आॅनलाईन आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी थोर महात्म्यांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या बलिदानाची आठवण करून दिली. विद्यार्थ्यांसाठी ही ऑनलाइन च्या माध्यमाने या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभक्तीपर गायन नृत्य व वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यातही ऑनलाइन च्या माध्यमाने सर्व विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवून आपल्या सादरीकरणाचे व्हिडीओ शाळेच्या व्हाट्सअप ग्रुप वर पाठवले. या आयोजनात शाळेतील शिक्षक मोहंती सर ,ज्योत्स्ना गजरे, जुली खंगार, अनिता मोरे, ऍडमिनिस्ट्रेटर नयना कुलकर्णी, यांच्या सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
शाळेच्या प्राचार्या डॉ. नायर मॅडम, संस्थेचे चेअरमन सुरेंद्रजी बोहरा सर व उपस्थित मान्यवरांनी सर्व विद्यार्थ्यांना आॅनलाईन स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.प्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.






