नाशिक जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण अधिकारी यांचेवर निलंबनाचीही कुऱ्हा ड???? लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांना अखेर अटक !
आठ लाखांच्या लाचप्रकरणात होत्या फरार
सुनिल घुमरे नाशिक
नाशिक : लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आठ लाख रुपयांच्या लाच प्रकरणात फरार असलेल्या नाशिकच्या लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांना अखेर अटक झाली व एक दिवसाची कस्टडी मिळाली असून या कारवाईनंतर त्यांचे निलंबन होण्याची दाट शक्यता वाटते शिक्षण विभागाकडून निलंबनाचा प्रस्ताव राज्य सरकारला जाईल मगच पुढील निर्णय घेतला जाऊ शकतो
ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक पंजाबराव उगले नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. वैशाली झनकर वीर यांना आज न्यायालयात हजर केले या प्रकरणातील इतर आरोपी पंकज दशपुते आणि ज्ञानेश्वर येवले या दोघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली ती संपली असून पुढे कोठडी वाढवणेत आली असल्याचे समजते
तक्रारदाराच्या संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या 20 टक्के अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरू करनेबाबत कार्यादेश काढून देण्यासाठी राजेवाडी शाळेचे प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते यांनी 6 जुलै रोजी शिक्षणाधिकारी वैशाली वीर यांच्यासाठी 9 लाख रुपयांच्या लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली. 27 जुलैला तडजोडीअंती 8 लाख रुपये वैशाली झनकर यांनी मान्य केले. शासकीय वाहन चालक ज्ञानेश्वर येवले यांच्यामार्फत ही लाच त्र्यंबक नाका भागात स्वीकारतानाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चालक येवलेला रंगेहाथ पकडले. ठाणे लाचलुचपत विभागाने केलेली ही कारवाई नाशिकमध्ये सध्या मोठाचर्चेचा विषय ठरत आहे.






