नाशिक क्रांतिभूमीतील क्रांतिकारी नेता म्हणजे दिपकभाई नन्नावरे -महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे.
प्रतिनिधी : शांताराम दुनबळे नाशिक
नाशिक :आगर टाकळी येथे आज सोमवार रोजी आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते दिपकभाई नन्नावरे यांचा अभिष्टचिंतन सोहळा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात व फटाक्यांच्या अतिषबाजीत संपन्न झाला.
तयाप्रसंगी महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांनी वरील वक्तव्य केले.
या कार्यक्रमास अध्यक्षस्थानी रामलीला समिती गांधीनगरचे महासचिव कपीलजी शर्मा होते.
.दिपकभाई नन्नावरे यांना वाढदिवसानिमित्त भारताच्या संविधानाची प्रत महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांनी भेट दिली.
याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश नेते मा.बाळासाहेब शिंदे यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला.
प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष भिमश्री विजयराज पगारे भारतीय बहुजन सेनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रशांतजी घोडेराव अन्याय अत्याचार कृती समितीचे मुख्य निमंत्रक राहुलभाऊ तुपलोंढे,वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ नेते पत्रकार प्रकाशजी निकम,आरपीआय(आठवले)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख सुनिलभाऊ यशवंते उत्तर महाराष्ट्र नेते बाळासाहेब पगारे, सामाजिक कार्यकर्ते किरणभाऊ खडताळे,युवा नेते जयेश सोनवणे, युवा नेते नवीन नन्नावरे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन युवा नेते विक्रांतभाई गांगुर्डे यांनी केले..






