Amalner

अमळनेर कट्टा..आणि चोरांना पोलिसांनी पकडले रंगे हाथ..

?️अमळनेर कट्टा..आणि चोरांना पोलिसांनी पकडले रंगे हाथ..

अमळनेर येथील बस स्थानकात चोरी करणाऱ्या 2 चोरांना पोलिसांनी अटक केली आहे. याबतीत सविस्तर माहिती अशी की आज दिनांक १३ /०७/२०२१ रोजी श्री दंगल सुरजन गिल वय ५४ धंदा शेतमजुरी रा. जवखेडा ता. अमळनेर हे त्याचे नातु सह अमळनेर शहरात येवुन आधार कार्ड बनवुन परत गावी जवखेडा येथे जाणे करीता अमळनेर शहरातील बस स्थानकात दुपारी ०२.३० वा. चे सुमारास अमळनेर जवखेडा बस मध्ये चढत असतानां गर्दीचा फायदा घेवुन इसम नामे १) जुबेर शेख भिकन वय १९ रा. गेंदालाल मिल जळगाव २) गौरव जगन कोळी वय १९ रा. शिवाजी नगर जळगाव अशानी त्याचे पॅन्टचे खिश्यात हात घालुन जबरीने ५०० रुपये काढुन घेवुन पळु लागले असता बस स्थानक ड्युटीवरील पोलीस अमलदार सहा.
फौज. निंबा शिंदे यानी नागरीकावे मदतीने त्यानां पकडुन पोलीस स्टेशनला हजर केले आहे.

सदर बाबत श्री दंगल सुरजन भिल यानी नमुद दोन्ही चोरटे विरुध्ध फिर्याद दिले वरुन अमळनेर पोरटे गुरन ३०३/२०२१ भादवि कलम ३९२,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात असुन नमुद दोन्ही इसमानां सदर गुन्हयात अटक
करण्यात आली आहे.गुन्हयाचा तपास पोना/अलोक साबळे हे करीत आहेत.
मिळुन आलेले चोरटे १) जुबेर शेख भिकन वय १९ रा. गेंदालाल मिल जळगाव २) गौरव जगन कोळी वय १९ रा. शिवाजी नगर जळगाव यानी या पुर्वी जळगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत बकरी चोरी केली असुन त्याचे विरुध्ध जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुरन २२०/२१ भादवि कलम ३७९ प्रमाणे दिनांक ११/०७/२०२१ गुन्हा दाखल असुन सदर गुन्हयात ते फरार आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button