Parola

आ. चिमणराव पाटील,पारोळा तालुका शिवसेना, युवासेना यांच्याकडून व्यंकय्या नायडू यांचा जाहीरनिषेध——-

आ. चिमणराव पाटील,पारोळा तालुका शिवसेना, युवासेना यांच्याकडून व्यंकय्या नायडू यांचा जाहीरनिषेध——-

पारोळा(प्रतिनिधी) – कमलेश चौधरी

राज्यसभा सदस्याच्या शपथविधी वेळी राज्य सभेचे सभापती तथा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभेत “जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी” या केलेल्या उच्चारला आक्षेप घेवून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमान कारक वक्तव्य केल्याने महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या भावना दुखावल्या गेल्यात.सदर घटनेचा पारोळा तालुका शिवसेना, युवासेनाचे कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराजांच्या स्मारका जवळ एकत्र येवून जाहीर निषेध करून घोषणा देण्यात आल्या.व्यंकय्या नायडू यांनी जनतेची जाहीर माफी मागून पदाचा राजीनामा द्यावा.

अश्या आशयाचे निवेदन अनिल गवांदे तहसीलदार पारोळा यांच्याकडे निवेदनाने करण्यात आले.निवेदनावर प्रा.आर.बी.पाटील तालुका प्रमुख, अमोल पाटील सभापती कृ.उ.बा. दादा पाटील तालुका उपप्रमुख, चतुर भाऊसाहेब, मधुकर पाटील, प्रा.बी.ऐन.पाटील,संचालक कृ.उ.बा.पारोळा, अशोक मराठे शिवसेना शहर प्रमुख,विजय पाटील तालुका छावा संघटना, संदीप पाटील मराठा सेवा संघ, राजू कासार मा.नगरसेवक,भूषण भोई उपशहर प्रमुख, समीर पाटील सरपंच देवगाव, आबा महाजन युवासेना शहरप्रमुख, छोटु उस्ताद, भारत पाटील, जिजाबराव बापू मा.संचालक शेतकी संघ, सुधाकर आण्णा संचालक शेतकी संघ, दादा भाऊ, गणेश मोरे, समाधान पाटील, भरत पाटील, शंतनू पाटील व समस्त शिवसेना, युवासेनेचे असंख्य कार्यकर्त्याच्या निवेदनावर सह्या केल्या व निवेदन दिले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button